– सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल
– एकमेकांसोबत राहणार्या महिला-पुरुषांचे संबंध विवाहासारखेच!
नवी दिल्ली/ नुपूर त्रिवेदी-झा
लग्नाविना जन्माला आलेल्या अपत्याचाही वडिलांच्या संपत्तीत वाटा आहे, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१४) दिला आहे. जर एक स्त्री आणि पुरुष बराचकाळ एकमेकांसोबत राहात असतील तर त्यांना विवाहाचाच दर्जा दिला जाईल. आणि, त्यांच्या संबंधातून जन्माला आलेल्या अपत्याला वडिलांच्या संपत्तीत हक्क असेल, असेही न्यायपीठाने स्पष्ट केले.
केरळ उच्च न्यायालयाने यासंदर्भात दिलेला निकालही सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. केरळ येथील एका व्यक्तीने वडिलांच्या संपत्तीत हिस्सा मागितला होता. परंतु, तो अनौरस पुत्र असल्याने त्याला हिस्सा नाकारण्यात आला होता.
यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये लीव्ह-इन-रिलेशनशीपला कायदेशीर मान्यता दिली होती.