खामगाव (ब्रेकिंग महाराष्ट्र):- जेसीआय खामगांव जयअंबे तर्फे स्थानिक संत तुकाराम महाराज सभागृहात रविवार 7 ऑगस्ट रोजी श्रावणोत्सव उत्साहात संपन्न झाला. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवास जवळपास 300 लहान मुलांनी व 700 महिलांनी आनंद घेतला. या उत्सवाचे उद्घाटन जेसी मयूर दायमा झोन उपाध्यक्ष झोन XIII यांनी केले. यावेळी मंचावर अध्यक्ष जेसी ॲड रितेश निगम, IPP जेसी डॉ शालिनी राजपूत, सचिव जेसी कौस्तुभ मोहता, कोषाध्यक्ष जेसी नम्रता लाठे, प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी सुरभि गोएंका, उपस्थित होते.
याप्रसंगी जेसी मयूर दायमा यांनी जेसीआय खामगांव जयअंबे च्या या अनोख्या व आगळ्यावेगळ्या प्रकल्पाचे खूप कौतुक केले. या उत्सवानिमित्त श्रावण महिन्यातील सर्व संस्कृतिक सण साजरे करण्यात आले व महिला सशक्तिकरणाच्या दृष्टिने ज्या महिला घरून व्यवसाय करतात किंवा ज्यांनी नवीनच व्यवसाय सुरू केला आहे अशा महिलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. याला महिला व्यावसायिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. जवळपास 30 वेगवेगळे स्टॉल धारक या उत्सवात सहभागी झाले होते. ज्यात महिलांच्या शृंगाराच्या वस्तू, साड्या, ड्रेस, घर सजावट च्या वस्तू, खाण्याच्या स्टॉल ज्यात चकली, खारोडी, ठेपला, सांबारवडी, दाबेली, दालपकवान, मोगलाई पराठा, खिचू, चुलीवरची गुळाची पुराण पोळी, ज्वारीची भाकरी, ठेचा , झुणका, पिज्जा, सँडविच इतर सहभागी झाले होते. नागपंचमी व तीज निमित्त झोके सुद्धा बांधण्यात आले होते.
या प्रसंगी सत्तू सजावट, झुला सजावट, टाकाऊ वस्तू पासून राखू बनवणे, महिलांसाठी श्रावण श्रृंगार, ट्रेजर हंट, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस आशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. ज्यात भारतीय संस्कृति व आधुनिकता यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला. या प्रसंगी उपस्थित महिलांनी आम्ही 20..25 वर्षा नंतर झोका खेळला. आमच्या मुलांनी तर असे झोके बघितले सुद्धा नाही ज्याचा आनंद आम्ही लहानपणी घेत होतो व खूप दिवसानंतर बालपणीच्या मित्रांची भेट झाली व फ्रेंडशिप डे अनोखा साजरा झाला. या करिता त्यांनी जय अंबे परिवाराचे भरभरून कौतुक केले व आभार मानले की आम्हाला आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या केल्या व आमच्या मुलांना सुद्धा आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवले.
या उत्सवाच्या यशस्वी करिता जेसी डाॅ.भगतसिंग राजपूत,जेसी डॉ सि.एम.जाधव, जेसी अनुप शंकरवार, जेसी पुनम घवालकर, जेसी देवांशी मोहता,जेसी योगेश खत्री,जेसी निखिल लाठे,जेसी पिया घवालकर, जेसी मंगेश राउत, जेसी नम्रता लाठे,जेसी सौरभ चांडक, जेसी निधी मोहता,जेसी अंकिता निगम, जेसी डॉ चेताश्री शंकरवार, जेसी हेतल वाधवाणी,जेसी रश्मी जैस्वाल, जेसी सोनम सांगाणी, जेसी कोमल भिसे, डाॅ.गौरव गोएंका,जेसी दिव्या अग्रवाल, जेसी दिपीका जैस्वाल, जेसी मोना खत्री,जेसी आरती राउत, जेसी ॲड. दिनेश वाधवानी, जेसी ॲड. गजानन जोशी, जेसी ऋषिकेश डिडवाणीया, जेसी अमोल घवालकर, जेसी रोहन जैस्वाल, जेसी डॉ कोमल गोएंका,जेसी कुणाल भिसे, जेसी डॉ सम्राट मानकर यांनी परिश्रम घेतले.