देऊळगाव राजा(ब्रेकिंग महाराष्ट्र):- तालुक्यातील दगडवाडी येथील जवळपास 12 भाविक भक्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 19 जून रोजी पंढरपूरला जाण्यासाठी निघाले असताना पुणे येथे पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आळंदी येथील माऊलीचे दर्शन घेऊन ते देहूला एकनाथ महाराजाचे दर्शन घेण्यासाठी गेले व नंतर पायी दिंडीमध्ये सामील होण्यासाठी पुणे येथील शिरसगाव चिखली रोडवर पायी चालत असताना अचानक पाठीमागे येऊन ट्रकने जबर धडक दिली. या धडकेत 4 जण जखमी तर एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २० जून रोजी घडली होती. याअपघातात भगवान साहेबराव घुगे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे हभप प्रकाशबुवा जंजवाळ वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व पंढरपूर विठ्ठल रुक्माई मंदिराचे ट्रस्टचे सदस्य यांनी 4 ऑगस्ट रोजी अपघातामध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली व वारकरी संप्रदाय तुमच्यासोबत आहे अशी त्यांनी ग्वाही दिली. त्यांच्यासोबत हभप वाघ व दगडवाडी येथील माजी सरपंच किसनराव डोईफोडे, माजी उपसरपंच रामेश्वर जायभाये, गजानन घुगे, भगवान कडूबा घुगे यांच्यासह अनेक मंडळी उपस्थित होती. यावेळी भजनी मंडळीच्या वतीने अशोक डोईफोडे व शंकर जायभाये यांनी महाराजांना अपघाताबाबत विस्तृत दिली.