पाताळयंत्री, कपटी, कारस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या नीच डावपेचाने भाजपला राज्यसभेत कलंकित विजय!
> तुरुंगातून निवडणूक लढवायला स्वातंत्र्य, पण मतदानाला नाही !
> पप्पू कलानी, भुजबळांना मतदान करण्याचे स्वातंत्र्य, पण देशमुख, मलिकांना नाही!
जळगाव (जिल्हा प्रतिनिधी) : देवेद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या खेळीमेळीच्या निर्भेळ राजकारणाला लागलेला कॅन्सर आहे. सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून स्वतःच्या स्वार्थासाठी शासकीय यंत्रणाचा गैरवापर करण्याच्या सर्व मर्यादा त्यानी मोडीत काढल्या आहेत. राज्याचे दुर्देव असे की भाजपच्या शिर्ष नेत्याचे आशीर्वाद आहेत. ‘एक मुलगा रस्त्याकडे तोड करून मुतत होता. त्या मुलाने यापुढे असे कृत्य करू नये. यासाठी रस्त्याने जाणार्या एका सभ्य गृहस्थाने मुलाला धमकी की ‘थांब तुझ्या बापाकडेच तकार करता तो सभ्य गृहस्थ अतिशय संतापात मुलाच्या घराकडे निघाला. समोरच दृश्य पाहून त्या सभ्य माणसाला धक्काच बसला. मुलाचे वडील दुसर्या मजल्यावरून खाली मुतत होते. आज भाजपची अशीच काहीशी अवस्था झाली आहे. सामान्य नागरिकाने दाद तरी कुणाकडे मागावी असा प्रश्न निर्माण झाला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धुळे-नंदुरबार जिल्हा प्रभारी अनिल गोटे यांनी केली.
प्रसिद्धी पत्रकात अनिल गोटे यांनी फडणवीस यांच्यासह भाजपवर जोरदार टीकास्त्र डागले. ते म्हणाले, भाजपाला राज्यसभेच्या निवडणूकीत मिळालेला विजय हे रणांगणावरचे यश नाही. अदानीच्या खाजगी बंदरावर उतरवलेल्या हजारो कोटी रूपयाच्या अमली पदार्थाच्या पैशातून किती मिळालेल्या कलंकीत विजय होय! देवेद्र फडणवीस यानी आपल्याच पक्षातील सहकारी नेत्यांची बेमालुमपणे वाट लावली. जनाधार असलेल्या बहुजन नेत्यांविरुध्द दिल्लीर्श्वराकडे चहाडया चुगल्या करायच्या! त्याची मने कलुषीत करायची, ज्याच्या खांदयावरून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचले असे बहुजनाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या राजकीय वारस सौ. पकजाताई याचा विधानसभेत पराभव व्हावा, यासाठी विरोधकाना रसद पुरवली राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी दिली जाईल असे वातावरण निर्माण करून धोका दिला. आयुष्याची ऐन उमिदीची ४० वर्ष शेटा भटाचा भारतीय जनता पक्ष गावकुसापर्यंत पोहचवला, त्या नाथाभाऊनी पक्ष सोडून बाहेर पडावे अशी व्यूहरचना करून त्यांना बाहेर पडायला भाग पाडले. जेणे करून पक्षात आपल्याला कोणीच स्पर्धक राहता कामा नये. इतका कपटी व पाताळमंत्री राजकारणी गेल्या ५५ वर्षांच्या राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत पाहिला नाही. अतिशय विधिनिषेधशुन्य व उघडपणे कुठल्याही थराला जाण्याची कपटी कारस्थानी, दगलबाज उच्चवर्णीय राजकारण्याची नोंद महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घ्यावीच लागेल. राजकारणातील दुसरे अनाजीपंत अशीच नोंद व्हावी. भविष्यातील लोकशाहीचे स्वरूप कसे असेल ? याचा ट्रेलरच भाजपने महाराष्ट्रात दाखवून दिला आहे. काही किरकोळ हरकती निर्माण करायच्या, पाळीव पत्रकाराना हाताशी धरून दिवसभर टिव्ही चॅनलवर तेच वळण दळत रहायचे ! शंभर वेळा खोट सांगीतल्यानंतर एकदा खर वाटत. अशा ग्लोबेल्स नीतीचा वापर करून जनतेमध्ये समभ निर्माण करायचा. अधिकार्यांवर दबाव आणून आपल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करून घ्यायचे हेच धोरण आणि तोरण ! न्यायालयाच्या चार भितीच्या आत माननीय न्यायाधीश जे बोलतील त्यालाच न्याय म्हणायचा ! आपली प्रथा आणि परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर तुरुगातील वैâद्यांना निवडणूक लढवण्याचे स्वातंत्र्य आहे. इडीच्या कस्टडीत असताना माननीय छगन भुजबळांना मतदानाचा हक्क बजावता आला. टाडा सारख्या गंभीर गुन्हयात तुरुंगात असलेल्या पप्पू कलानीला मतदानाचा हक्क बजावता आला. पण त्याच तपासी यंत्रणेच्या कच्च्या कैदेत असलेल्या अनिल देशमुख आणि नवाब मलीक या दोन कच्या कैदयांना मात्र मतदानाचा हक्क नाकारला यालाच न्याय म्हणायचा!!!
माझे मत असे आहे की, अमिताभ बच्चनच्या अंधा कानून चित्रपटाची सुधारून वाढवलेली महाराष्ट्राच्या राजकारणाची नवी सकल्पना असावी या सकल्पनेवर अधाकानून भाग- २ नवा चित्रपट निघू शकतो. असे स्पष्ट सडेतोड पत्रक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अनिल अण्णा गोटे यानी आज प्रसिध्दीस दिले आहे.
जनाधार असलेल्या बहुजन नेत्यांविरुध्द दिल्लीर्श्वराकडे चहाडया चुगल्या करायच्या! त्याची मने कलुषीत करायची, ज्याच्या खांदयावरून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचले असे बहुजनाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या राजकीय वारस सौ. पकजाताई याचा विधानसभेत पराभव व्हावा, यासाठी विरोधकाना रसद पुरवली राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूकीत उमेदवारी दिली जाईल असे वातावरण निर्माण करून धोका दिला. आयुष्याची ऐन उमिदीची ४० वर्ष शेटा भटाचा भारतीय जनता पक्ष गावकुसापर्यंत पोहचवला, त्या नाथाभाऊनी पक्ष सोडून बाहेर पडावे अशी व्यूहरचना करून त्यांना बाहेर पडायला भाग पाडले. जेणे करून पक्षात आपल्याला कोणीच स्पर्धक राहता कामा नये. इतका कपटी व पाताळमंत्री राजकारणी गेल्या ५५ वर्षांच्या राजकारणाच्या प्रदीर्घ वाटचालीत पाहिला नाही.
- अनिल गोटे