चिखली (तालुका प्रतिनिधी) – आपल्या धडाकेबाज विकासकार्यातून लोकप्रियतेचा आलेख अधिक उंचावणाऱ्या आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, ग्रामीण भागातील युवक मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात दाखल होत आहेत. तालुक्यातील वळती आणि भोकर येथील लोकांची मोठी फौज भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळे यांच्या पुढाकारातून भाजपात सहभागी झाली. युवक काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षांसह दोन्ही गावातील तरुणांच्या या पक्षप्रवेशामुळे वरती आणि भोकरमध्ये आ. महाले यांना निश्चितच मताधिक्य मिळेल, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या शिवाय, मौजे बोरगाव काकडे येथील युवक काँग्रेसचे शाखा अध्यक्ष परमेश्वर मांजरे यांनीदेखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विष्णू वांजोळ यांच्यासह भोकर येथील युवा कार्यकर्ते विजय इंगळे, वैभव नेवरे, काशिनाथ नेवरे, विष्णू देवकर, अनिल नेवरे, विष्णू नेवरे, श्रावण फोलाने, करण मुरडकर, सुनील मुरडकर, शंकर वाघ, स्वप्निल इंगळे, विजय देवकर, सुरज सोनुने, मयूर वाघ, अकाश शेवाळे, योगेश नेवरे, विनोद डोंगरदिवे, ज्ञानेश्वर फोलाने, मुकेश डोंगरदिवे, विकास डोंगरदिवे, गजानन इंगळे, संदिप नेवरे, प्रवीण नेवरे, राजवीर नेवरे, मनोहर डोंगरदिवे, सिद्धार्थ डोंगरदिवे, दिलीप इंगळे, आकाश नेवरे, विजू देवकर, ऋषीकेश वाघ तसेच वळती येथील आदित्य धनवे, अक्षय घनवे, अनिकेत चिचोले, दर्शन सावंत, कुष्णा धनवे मंगेश शिंगणे, सोमनाथ लेडे, सोहम शितोळे, दीपक उगले, रोहन धनवे, सुरेश भनगे, पवन धनवे, अंकुश उगले, मोहन भनगे, नागेश शितोळे, प्रदीप उगले, रोहन भागीले, अभिषेक सुरोशे, निलेश केसकर, तुषार जवंजाळ, ओम पवार, योगेश चिंचोले, मंगेश हेडगे, मंगेश पोटे, शिवम गायकवाड, आकाश गालट, सोपान मराठे धनवे, ओम जाधव, राहुल गायकवाड, राहुल पैठणकर, अमोल कदम, गोविंद धनवे, कार्तिक कदम, गोपाल धनवे, गोपाल उबरहंडे, पिंटू सुसर, सचिन सरोदे, मंगेश जाधव, दीपक भुतेकर, पवन जवंजाळ, अनिकेत लव्हाळे, अनिल भनगे, मंगेश यगड, शरद यंगड, आकाश जाधव, सोनू जाधव, सोहम जगताप, शुभम जगताप आणि पवन जगताप या योगाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भाजपा प्रवेश करणाऱ्या सर्व युवकांचे आमदार श्वेताताई महाले यांनी पक्षाचे रुमाल देऊन स्वागत केले. युवकांच्या पक्षातील सहभागाने भारतीय जनता पक्षात अधिक चैतन्य वाढेल तसेच विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी ग्रामीण भागातील लोकांना नक्कीच मिळेल, असा विश्वास यावेळी बोलताना आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केला. या सर्व युवकांचे भवितव्य उज्वल बनवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देत श्वेताताई महाले यांनी सर्व युवा कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत केले. या पक्षप्रवेशप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, जेष्ठ नेते एड. मंगेश व्यवहारे, सुरेंद्रप्रसाद पांडे, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर काळे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पंजाबराव धनवे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.