– विकासाला प्राधान्य देणार्या श्वेताताईंच्या विजयासाठी बल्लाळदेवीकडे मागितले भरभरून आशीर्वाद!
चिखली (तालुका प्रतिनिधी) – राजकारण हे जनसेवेचे माध्यम आहे आणि जनसेवा हे एक विधायक व्रत आहे, या भूमिकेतून कार्य करणार्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात केवळ अडीच वर्षात केलेल्या उत्तुंग विकासकामांची मालिका पुढील पाच वर्षेसुद्धा अविरत सुरू राहावी, यासाठी समाजातील अनेक घटक आपापल्या परीने प्रयत्नशील आहेत. असाच एक युवकांचा गट सवणा येथे असून, श्वेताताईंच्या विकास कार्यामुळे प्रभावित झालेल्या या लोकांनी श्वेताताई महाले यांना सलग दुसर्यांदा विजयश्री प्राप्त व्हावी, याकरिता अमडापूर येथील श्री बल्लाळ देवीला साकडे घातले. सवना ते अमडापूर अशी पायी वारी काढत, बल्लाळ देवीला पातळ अर्पण करून जगदंबेला श्वेताताईंच्या विजयासाठी जगदंबेला आशीर्वाद मागितले.
चिखली शहरालगतच असलेल्या सवणा येथील या विकासप्रेमी युवकांनी दि.१० नोव्हेंबररोजी गावातून पायीवारीला सुरुवात केली. नितीन हजारे, दिनकर चोपडे, योगेश आदमाने, श्रीनाथ पवार, पवन शेळके, तुषार भुतेकर, संतोष हजारे, पांडुरंग सुरोशे, ज्ञानेश्वर कुदळे, गोपाल सावंत, शुभम गाढवे, गजानन भुतेकर, गजानन चोपडे, पवन खेडेकर, पवन पेटुळे, हनुमान हाडे, अजय चिकणे, अमोल बोंबले, अमोल निकाळजे, अमोल सुरोशे, सुनील दातार, वैभव वैद्य, वैभव गाढवे, मंगेश धारे, वैभव कोल्हे, पुरुषोत्तम पवार, संजय गायकवाड, ऋषिकेश भालेराव, माधव पंडित, शुभम देवडे, सागर शेळके, विजय खंडागळे, प्रणव पवार, ज्ञानेश्वर सोलाट, विवेक माने, उदय पवार, विठ्ठल भुतेकर, शुभम हातागळे, ओम हातागळे, बाबू भुतेकर, सिद्धेश्वर सोलाट, अमोल शेळके, संतोष सोलाट, विजय बनसोडे या युवकांचा या पायदळवारीमध्ये समावेश आहे. विकास कार्याच्या माध्यमातून जनतेचे मनं जिंकणार्या आमदार श्वेताताई महाले यांच्या विजयाकरिता आपल्या आराध्य देवतेला साकडे घालणार्या या युवकांचा हा अभिनव उपक्रम संपूर्ण चिखली मतदारसंघात कौतुकाचा विषय बनला आहे.
शेतकर्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना २१०० रूपये, २५ लाख नोकर्या!