Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPolitics

सहा मतदारसंघातील ‘बंडोबा’ झाले थंड; सिंदखेडराजात मात्र ‘दोस्तीत कुस्ती’!

- सात विधानसभा मतदारसंघात ११५ उमेदवार रिंगणात!; बंडखोरांना शांत करण्यात महायुती व महाआघाडीला यश

– परांपरागत लढतीचेच चित्र समोर; मतदारांचा कौल कुणाला?

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघासाठी आता ११५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उरले असून, महाआघाडी व महायुतीला बंडखोरांना शांत करण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी राजकीय तडजोडीअंती बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. मलकापूर येथे ७, बुलढाणा येथे ८, चिखली येथे १८, सिंदखेडराजा येथे १८, मेहकर येथे ११, खामगांव येथे ४ व जळगांव जामोद येथे ६ असे एकूण ७२ उमेदवारांनी आजच्या अंतिम दिवशी आपले अर्ज मागे घेतले असून, त्यामुळे सातही मतदारसंघाकरिता आता ११५ उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झालेले आहे. सिंदखेडराजात मात्र महायुतीत दोस्तीत कुस्तीचेच चित्र समोरे आले असून, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मनोज कायंदे हे रिंगणात कायम आहेत. तसेच, शिंदे गटाकडून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनीही मैदानात आपले दंड थोपाटलेले आहेत, त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याशी होत आहे. डॉ. शिंगणे व डॉ. खेडेकर यांच्या तुल्यबळ लढतीत एखादवेळ मनोज कायंदे यांनाही येथून राजकीय लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे, गायत्री शिंगणे यांनीदेखील आपला अर्ज कायम ठेवला असून, त्यांचेही बंड राेखण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अपयश आल्याचे दिसून येत आहे.

या असणार आहेत, जिल्ह्यातील ठळक लढती!

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मलकापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप देविदास फाटे (अपक्ष), मोहम्मद दानीश अब्दुल रशीद (अपक्ष), विरसिंह ईश्वरसिंह राजपूत (अपक्ष), सुनील वसंतराव विंचणकर (अपक्ष), सचिन दिलीप देशमुख (अपक्ष), सौरभ चंद्रवदन इंगळे (अपक्ष), हरीश महादेवसिंह रावळ (अपक्ष यांनी अर्ज मागे घेतले असून, बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून प्रमोद पुंजाजी कळसकर (अपक्ष), स्वाती विष्णू कंकाळ (अपक्ष), प्रा. सदानंद मन्साराम माळी (अपक्ष), जितेंद्र एन. जैन. (अपक्ष), प्रा. रतन आत्माराम कदम (अपक्ष), विजयराज हरिभाऊ शिंदे (अपक्ष), डॉ. मोबीन खान अय्युब खान (अपक्ष), आरिफ खान विवन खान (अपक्ष) यांनी अर्ज मागे घेतले. माजी आमदार विजयराज शिंदे यांनी अर्ज माघारी घेतल्याने महायुतीतील बंडखोरी टळली आहे. त्यांच्या माघारीने आ. संजय गायकवाड यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, आ. गायकवाड यांना तुल्यबळ लढत देईल, असा उमेदवारच येथे महाआघाडीने दिलेला नाही, असे राजकीय चित्र आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातून नरहरी ओंकार गवई (अपक्ष), नाजेमा नाज इम्रान पठाण (अपक्ष), अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर (अपक्ष), सौ. वृषाली राहुल बोंद्रे (अपक्ष), रविंद्र नारायण डाळीमकर (अपक्ष), मृत्युंजय संजय गायकवाड (अपक्ष), मनोज सारंगधर लाहुडकर (अपक्ष), सतीश मोतीराम गवई (अपक्ष), बबन डिगांबर राऊत (अपक्ष), विनायक रामभाऊ सरनाईक -अंभोरे (अपक्ष), शरद रमेश खपके (अपक्ष), सिध्दार्थ अंकुश पैठणे (अपक्ष), देवानंद पांडुरंग गवई (अपक्ष), मिलींदकुमार सुधाकर मघाडे (अपक्ष), नितीन रंगनाथ इंगळे-राजपूत (अपक्ष), संजय धोंडू धुरंधर (अपक्ष), अब्दुल वाहीद शे. इस्माईल (अपक्ष), राजेंद्र सुरेश पडघान (अपक्ष) यांनी अर्ज माघारी घेतले आहेत. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सातही मतदारसंघात उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. परंतु, त्यांच्या दोन्हीही शिलेदारांनी अर्ज माघारी घेतल्याने तुपकरांनी आपली तलवार म्यान केल्याचे दिसून येत आहे. सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून डॉ. मनोरखा रशीदखा पठाण (अपक्ष), शेख रफिक शेख शफी (अपक्ष), अभय जगाराव चव्हाण (अपक्ष), विजय प्रतापराव घोंगे (अपक्ष), मनसब खान सादतमीर खान पठाण (अपक्ष), राजेंद्र मधुकर शिंगणे (अपक्ष), शिवाजी बाबुराव मुंढे (अपक्ष), शिवानंद नारायण भानुसे (संभाजी ब्रिगेड पार्टी), प्रकाश भिवाजी गिते (बहुजन समाज पार्टी), अशोक श्रीराम पडघान (अपक्ष), ज्ञानेश्वर कैलास म्हस्के (अपक्ष), नामदेव दगडू राठोड (अपक्ष), सुनील तोताराम कायंदे (अपक्ष), सुरज धर्मराव हनुमंते (अपक्ष), अंकुर त्र्यंबक देशपांडे (अपक्ष), अल्का रामप्रसाद जायभाये (अपक्ष), भाई दिलीप ब्रम्हाजी खरात (अपक्ष), प्रल्हाद रंगनाथ सोरमारे (अपक्ष) यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. भाजपचे ओबीसी नेते डॉ. सुनील कायंदे यांनी अर्ज माघारी घेतल्याने येथेही महायुतीतील बंडखोरी टळली असल्याचे चित्र असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मनोज कायंदे यांनी मात्र आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे येथे महायुतीत दोस्तीत कुस्ती रंगणार आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघातून नरहरी ओंकार गवई (अपक्ष), डॉ. सांची सिध्दार्थ खरात (अपक्ष), प्रकाश गणपत अंभोरे (अपक्ष), लक्ष्मणराव जानुजी घुमरे (अपक्ष), मुरलीधर दगडू गवई (अपक्ष), वामनराव सूर्यभान वानखेडे (अपक्ष), डॉ. गोपालसिंह बछीरे (अपक्ष), प्रकाश चिंधाजी गवई (अपक्ष), डॉ. जानू जगदेव मानकर (अपक्ष), रजनीकांत सुधीर कांबळे (राष्ट्रीय समाज पक्ष), कैलास कचरू खंदारे (अपक्ष) यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. डॉ. गोपाल बछिरे, लक्ष्मणराव घुमरे यांनी आपले अर्ज माघारी घेतल्याने येथील महाआघाडीतील बंडखोरी टळली आहे. खामगांव विधानसभा मतदारसंघातून अ‍ॅड. रवींद्र भोजने (अपक्ष), अमोल अशोक अंधारे (अपक्ष), शिवशंकर पुरूषोत्तम्ा लगर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), किरण रामचंद्र मोरे (अपक्ष) यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून अमित रमेशराव देशमुख (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), अरूण भिकाजी निंबोळकर (अपक्ष), पवन भाऊराव गवई (अपक्ष), देवानंद शंकर आमझरे (अपक्ष), मंगेश विश्वनाथ मानकर (अपक्ष), डॉ. संदीप रामदास वाकेकर (अपक्ष) यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
———–

चिखलीत २४ उमेदवार रिंगणात; लढत मात्र श्वेताताई महाले व राहुल बोंद्रे यांच्यातच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!