मोताळा- मोताळा शहरातील आठवडी बाजारातील नांदुरा रोडवरील मुख्य चौकामधील कृषी सेवा वेंâद्राचे गोडावून फोडून चोरट्यांनी सुरेश सदाणी यांच्या कृषीकेंद्रातील सोयाबीन, कपासी, मका, तूर बियाण्याचे पाकीट व नगदी असा एकूण ३ लाख ८० हजार रुपयांच्या माल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ६ जूनच्या सकाळी घडली होती. त्या घटनेतील चोरटयांना पकडणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते, परंतु बोराखेडी पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत मलकापूर येथील सायकलपु-यातील एका अट्टल सराईत घरफोड्याला रविवार १२ जूनच्या रात्री २ लक्ष ६० हजाराच्या मुद्देमालसह गजाआड केले. त्या आरोपीला आज सोमवार १३ जून रोजी मोताळा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १६ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनाविली आहे. यामुळे अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणातील 4 आरोपी मात्र फरारच आहेत.
मोताळा शहरात चो-यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. दिवसाढवळ्या शेतकNयांचे पैसे पळविणारे तसेच शेतमालाची चोरी करण्याच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. एका चोरीचा शोध बोराखेडी पोलिस घेत असतांना दुसरीकडे चोर चोरी करत असल्याने पोलिसांपेक्षा चोरट्यांचे नेटवर्वâ पावरपुâल्ल असल्याची चर्चामुळे पोलिसाप्रती नागरिक व व्यापाNयामधून रोष व्यक्त केल्या जात होता. याप्रकरणी बोराखेडी पोस्टे ठाणेदार राजेंद्र पाटील यांनी सदर घटनेचा तपास सपोनी.विकास पाटील यांच्याकडे देवून पोलिसांच्या एका विशेष पथकाची नेमणूक केली होती. सीसीटीव्ही पुâटेज व तांत्रीक माहितीच्या आधारे सुताच्या आधारे सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या वाहनाची माहिती काढीत गुन्ह्यात सहभागी आरोपींची नावे व आरोपी कुठे सदर कृषीवेंâद्रातील माल विकत असल्याची माहिती काढून मलकापूर येथे कोण माल विकतो याचा धागा जोडून आरोपीचा माग काढीत घरफोडी करणा-या मुख्य आरोपी शेख साबीर शेख अहमद (वय २८) रा.सायकलपूरा मलकापूर याला ताब्यात घेवून त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केल्याने त्याला १२ जूनच्या रात्री अटक करुन त्याच्याकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी कापूस बियाणे, मका बियाणे, ज्वारीचे बियाणे व इतर बियाणे तसेच सदर गुन्ह्यात गुन्हा करतांना वापरण्यात आलेले छोटा हत्ती वाहन क्र.एम.एच.२८ अेबी.१०५४ असा एकूण २ लक्ष ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उर्वरीत ४ आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. आरोपी शेख साबीर शेख अहमद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यात विविध गुन्हे दाखल असल्याचे समजते. सदर कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अरविंद चावरीया, खामगाव अप्पर पोलिस अधिक्षक श्रवण दत्त, बुलडाणा उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बोराखेडी ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी.विकास पाटील, पीएसआय. अशोक रोकडे, पोहेकाँ.नंदकीशोर धांडे, पोना.दिपक पवार, विजय पैठणे, रमेश नरोटे, पोकाँ.श्रीकांत चिंचोले, गणेश बरडे यांनी केली. त्यांना तांत्रीक मदत पोना.राजु आडवे यांनी तर मलकापूर शहरचे डी.बी.पथकाने सहकार्य केले.