Breaking newsHead linesPolitical NewsPolitics

चिखलीत श्वेताताई महालेंविरुद्ध राहुल बोंद्रेच लढत!

- काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बुलढाणा काँग्रेसला नाहीच!

– राहुल बोंद्रे चिखली, राजेश एकडे मलकापूरमधून उमेदवार जाहीर!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – अखिल भारतीय काँग्रेसची पहिली यादी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली असून, या यादीत चिखलीतून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांना तर मलकापुरातून आ. राजेश एकडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या यादीत ४८ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत बुलढाण्याचा समावेश नसल्याने बुलढाण्याची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहणार असून, स्थानिक नेत्यांनी कितीही विरोध केला तरी, जयश्रीताई शेळके याच महाआघाडीच्या उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसरीकडे, चिखलीत पुन्हा एकदा भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले व राहुल बोंद्रे यांच्यात लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसने रात्री उशिरा आपली पहिली यादी जाहीर करताना, ४८ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात, कराड दक्षिण येथून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, संगमनेरातून बाळासाहेब थोरात, पुण्यातील कसबा पेठ येथून रवींद्र धंगेकर, साकोलीतून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, धामणगावमधून विरेंद्र जगताप, तिवसातून यशोमती ठाकूर, ब्रम्हपुरीतून विजय वडेट्टीवार, रिसोडमधून अमित झनक, उत्तर नागपूरमधून नितीन राऊत, पश्चिम नागपूरमधून विकास ठाकरे, देवळी (वर्धा)मधून रणजीत कांबळे, राजुरा (चंद्रपूर) मतदारसंघातून सुभाष धोटे, अमरावती शहरमधून डॉ.सुनील देशमुख, अचलपूरमधून बबलू देशमुख तर कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडीमधील जागांचा तिढा काहीसा निवळला असल्याने आता काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली असली तरी, काही जागांचा तिढा मात्र कायम असल्याचे राजकीय सूत्राने सांगितले आहे.
—-
– काँग्रेसने जाहीर केलेली यादी –
अक्कलकुवा – अ‍ॅड. के.सी. पडवी
शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
नंदुरबार – किरण दामोदर तडवी
नावापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
साक्री – प्रविण बापू चौरे
धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
रावेर – अ‍ॅड. धनंजय शिरीष चौधरी
मलकापूर – राजेश पंडितराव एकडे
चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
रिसोड – अमित सुभाषराव झनक
धामणगाव रेल्वे – प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
अमरावती – डॉ.सुनील देशमुख
तिवसा – अ‍ॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
अचलपूर – अनिरुद्ध सुभानराव देशमुख
देवळी-पुलगाव – रणजीत प्रताप कांबळे
नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल विनोदराव गुडधे
नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे
नागपूर उत्तर – डॉ. नितीन काशिनाथ राऊत
साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे
गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
राजुरा – सुभाष रामचंद्रराव धोटे
ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
फुलंब्री – विलास केशवराव औताडे
मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन
मालाड – पश्चिम अस्लम आर. शेख
चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
धारावी – डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
भोर – संग्राम अनंतराव थोपटे
कसबा पेठ (पुणे) – रवींद्र हेमराज धंगेकर
संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
शिर्डी – श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
लातूर ग्रामीण – धीरज विलासराव देशमुख
लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
अक्कलकोट – सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
करवीर – राहुल पांडुरंग पाटील
हातकणंगले – राजू जयंतराव आवळे
पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!