मेहकर (तालुका प्रतिनिधी) – शेतकरी नेते ऋषांक चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार तथा शेतकरी नेत्या डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारासाठी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरूवात केली असून, त्यांच्या गाव भेट दौर्यांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या दौर्यात ग्रामस्थ हे मतदारसंघात परिवर्तनाची ग्वाही देत आहेत. दरम्यान, डॉ. ऋतुजा चव्हाण या येत्या २८ ऑक्टोबररोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. मेहकर मतदारसंघात तिहेरी लढत निर्माण झाली असून, डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी दोन्हीही शिवसेनेच्या उमेदवारासमोर जोरदार आव्हान निर्माण केलेले आहे.
राजमाता जिजाऊ मॉसाहेबांचा जिल्हा असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात बहुजन चळवळीतील तीन रणरागिणी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत. बुलढाण्यातून अॅड. जयश्री शेळके, मेहकरातून डॉ. ऋतुजा चव्हाण तर चिखलीतून श्वेता महाले. या तीनही महिला वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या असल्या तरी, त्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या लेकी म्हणून जिजाऊ मॉसाहेबांच्या माहेरघराचे नेतृत्व विधानसभेत करण्याचीसाठी पोहोचणार आहेत, अशी एक लोकभावना जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळेच डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या प्रचारासाठी शेतकरी नेते ऋषांक चव्हाण जेव्हा गावभेट दौरे करत आहेत, तेव्हा त्यांना उस्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे.
मेहकर-लोणार मतदारसंघाचा विकास फक्त डॉ. ऋतुजा चव्हाण याच करू शकतील, आम्ही त्यांना मोठ्या मतांनी विजयी करू, असा विश्वास ग्रामस्थ देत आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या गावभेट दौर्यामध्ये स्वयंस्फूर्तींने गावातील ग्रामस्थ उपस्थित राहात आहेत.
—————-