Head linesMEHAKARPolitics

कट्टर शिवसैनिक डॉ.शिवप्रसाद गोंधणेंनी मागितली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे उमेदवारी!

- मेहकर-लोणार मतदारसंघातून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून शिवसेनेची उमेदवारी देण्याची मागणी

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर मतदारसंघातून एकमेव निष्ठावंत जेष्ठ शिवसैनिक डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांनी यांनी मुंबई येथे जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, डॉ. गोधने हे शिवसेनेचे जिल्ह्यातील शिवसैनिव व एकमेव निष्ठावंत तथा शिलेदार आहेत. पक्षाच्या प्रत्येक लढ्यामध्ये ते संक्रिय असतात. गेल्या ३६ वर्षापासून ते कोणतेही पद न मागता, शिवसेना (ठाकरे) पक्ष वाढविण्यासाठी एकनिष्ठपणे कार्य करत आहेत. तसेच, ते मेहकर-लोणार तालुक्यातील प्रसिद्ध व लोकप्रिय डॉक्टरदेखील आहेत.

डॉ. गोंधणे यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठे मेळावेसुद्धा घेतलेले असून, ग्रामीण भागात, शहरात आणि वार्डावार्डामध्ये त्यांनी शिवसेनेच्या अनेक शाखादेखील उघडलेल्या आहेत. अनेक वेळा त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. परंतु प्रत्येकवेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही. ज्या उमेदवाराला उमेदवारी मिळाली त्यांना तन, मन, धनाने निवडून आणले आहे.

डॉक्टर गोधने हे मध्यभारतातील चर्मरोगतज्ज्ञ आहेत. ते मेहकर व जिल्ह्यामध्ये गरजू रुग्णांना मोफत इंजेक्शन, गोळ्या, लोशन मोफत देतात. तरी जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या डॉ. शिवप्रसाद गोंधणे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांच्यासह मेहकर व लोणार तालुक्यातील निष्ठांवत शिवसैनिक व कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसेना नेत्यांकडे केलेली आहे.

Shivsena

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!