Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

रविकांत तुपकरांना महाआघाडीच्या निर्णयाची प्रतीक्षा; तोपर्यंत ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’!

- 'क्रांतिकारी शेतकरी संघटनेची स्थापना'; बुलढाणा येथील राज्यस्तरीय बैठकीत घोषणा

– महाविकास आघाडीसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचे सूतोवाच; अन्य पर्यायही ठेवले खुले!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विधानसभा निवडणुकीत आपल्यासमोर सध्या चार पर्याय आहेत. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, दुसरा महायुतीचा, तिसरा वंचित बहुजन आघाडीचा आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे आहे. त्यावर काय करायचे..? तुमच्या मनात काय आहे, असे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यभरातून आलेल्या आपल्या कार्यकर्ते व समर्थकांना विचारताच, महाविकास आघाडीसोबत जाण्यास प्राधान्य द्यावे, जर ते सकारात्मक झाले नाही तर सर्व पर्याय आपल्यासमोर खुले आहेत, असे या सर्वांनी तुपकरांना सांगितले. आपली महाविकास आघाडीसोबत सकारात्मक चर्चा सुरू असून, महाविकास आघाडीकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन यावेळी तुपकर यांनी याप्रसंगी करून, आणखी काही दिवस ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’चा सल्ला आपल्या समर्थकांना दिला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, दि. २२ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बुलढाण्यात बोलावली होती. या बैठकीत त्यांनी कोणतीही राजकीय भूमिका जाहीर न करता कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला.

May be an image of 14 people, flute, dais, temple and textराज्यात शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांवर आवाज उठवण्यासाठी रविकांत तुपकर यांनी बिगर राजकीय सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे. ‘क्रांतिकारी शेतकरी संघटनेची’ घोषणा त्यांनी आज (दि.२२) बुलढाणा येथे झालेल्या राज्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत केली. चळवळीचे अस्तित्व कायम ठेवून क्रांतिकारी शेतकरी संघटना महाविकास आघाडीसोबत जाण्यास सकारात्मक असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महाविकास आघाडी सोबत बोलणे झाले असून, महाविकास आघाडीकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षादेखील रविकांत तुपकर यांनी या बैठकीत व्यक्त केली. बुलढाणा शहरातील गोलांडे लॉन्स येथे ही बैठक पार पडली. या तातडीच्या आणि महत्त्वपूर्ण समजल्या जाणार्‍या बैठकीत शेतकरी नेते रविकांत तुपकर नेमकी काय भूमिका जाहीर करतात, या याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून होते. अखेर या मेळाव्यात तुपकर यांनी मोठा निर्णय घोषित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून तुपकरांना बाजूला केल्यानंतर शेतकरी चळवळ पुढे नेण्यासाठी आपली वेगळी अशी स्वतंत्र संघटना असावी, अशी मागणी राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची होती. त्यानुसार रविकांत तुपकरांनी सर्वांशी चर्चा करून स्वतंत्र संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, तुपकरांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची घोषणा आज बुलढाण्यात झालेल्या राज्यातील पदाधिकार्‍यांच्या बैठकीत केली. तुपकरांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना’ आता राज्यभर अधिक व्यापक पद्धतीने काम करणार आहे. ही संघटना केवळ शेतकर्‍यांपुरतीच मर्यादित राहणार नसून, समाजातील प्रत्येक घटकासाठी ही संघटना काम करणार आहे. बिगर राजकीय सामाजिक संघटना म्हणून ही संघटना राज्यभरात आक्रमकपणे काम करेल, असे रविकांत तुपकर यांनी यावेळी सांगितले.

May be an image of 6 people and text“आपली शेतकऱ्यांची वोट बँक राज्यातील 27 जिल्ह्यात आहे. त्यांचा निर्णय उद्यापर्यंत कळवा. ज्या जागा निवडणुन येणार असतील त्याचं जागा आपण लढविणार आहे.आम्हाला सन्मानाने सोबत घ्या, लाचारी करणार नाही. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, तिसरा पर्याय वंचितचा मग चौथा पर्याय स्वतंत्र राहील. मात्र महायुतीसोबत जायचे नाही. महाविकास आघाडी किंवा वंचित हे दोनच पर्याय आहेत. अन्यथा कोणाला पाडायचं व कोणाला निवडून आणायचं यावर लक्ष केंद्रित करु. गनिमी काव्याने ही निवडणूक लढवावी लागेल,” असं रविकांत तुपकर म्हणालेत.

सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकीत आपल्यासमोर सध्या चार पर्याय आहेत. पहिला पर्याय महाविकास आघाडीचा, दुसरा महायुतीचा, तिसरा वंचित बहुजन आघाडीचा आणि चौथा पर्याय म्हणजे स्वतंत्र लढणे आहे. त्यावर काय करायचे..? तुमच्या मनात काय आहे, असे विचारताच महाविकास आघाडीसोबत जाण्यास प्राधान्य द्यावे, जर ते सकारात्मक झाले नाही तर सर्व पर्याय आपल्यासमोर खुले आहेत, असे उपस्थित पदाधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, आपली महाविकास आघाडीसोबत सकारात्मक चर्चा सुरू असून, महाविकास आघाडीकडून सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे, असेदेखील रविकांत तुपकरांनी यावेळी सांगितले. ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना’ म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राहील, निवडणूक कोणत्या सिम्बॉलवर लढवायची हे ठरवू, यासंदर्भात आपली १० जणांची कोअर कमिटी निर्णय घेईल. तुमच्या मनाप्रमाणे निर्णय होणार आहे, त्यामुळे ताकदीने कामाला लागा, असा सूचक इशाराही रविकांत तुपकर यावेळी यांनी दिला. दोन दिवसात अधिकृतपणे निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे, त्यादृष्टीने तयार रहा, असेही तुपकरांनी सांगितले.

—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!