राज्यांत खुलेआम गुंडाराज; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्धीकी यांची गोळी घालून हत्या
- मुंबईतील वांद्रे परिसरातील घटना, हल्लेखोरांनी अगदी जवळून घातल्या गोळ्या
मुंबई (प्रतिनिधी) – या राज्यात गुंडाराज अवतरले असून, पोलिसांचा धाक संपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तेने बाबा सिद्धीकी यांच्यावर मुंबईतील वांद्रे परिसरात हल्लेखोरांनी अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने लीलावती रूग्णालयात हलवण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. आज रात्री ९ वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.
बाबा सिद्दीकी यांच्यावर २ ते ३ राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सिद्दीकी यांना लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसच्या परिसरातच गोळीबार झाला असून, या घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या एका सहकार्याच्या पायालाही गोळी लागली आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते रुग्णालयात दाखल झाले. अभिनेता संजय दत्तदेखील रुग्णालयात दाखल झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉक्टरांना फोन करून माहिती घेतली आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर ३ ते ४ राऊंड फायर केले होते. ज्यातील एक गोळी त्यांच्या छातीला लागली. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती समोर येत आहे. एसआरए प्रकल्पाच्या वादातून त्यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत असून, मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता.
https://x.com/i/status/1845154991738069462