CrimeHead linesMEHAKARVidharbha

चालत्या ट्रॅव्हल्सवर दगडफेक करणार्‍या आरोपींच्या बिबी पोलिसांनी मुसक्या आवळल्या!

- रामभरोसे हॉटेल्सवर गाडी थांबवत नसल्याने हॉटेलचालकानेच केली साथीदारांच्या सहाय्याने दगडफेक

– समृद्धी महामार्गावरील माही ट्रॅव्हल्सवर दगडफेकीचे प्रकरण

बिबी (ऋषी दंदाले) – दिग्रस येथून मुंबई येथे जाण्यासाठी निघालेल्या माही ट्रॅव्हल्स कंपनीच्या ट्रॅव्हल्स बसवर दि. ७ ऑक्टोबररोजी दगडफेक झाली होती. या घटनेत समोरील काच फुटून चालकासह तिघेजण जखमी झाले होते. या दगडफेक प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात बिबी पोलिसांना यश आले असून, हॉटेलसमोर बस थांबवत नसल्याच्या रागातून रामभरोसे हॉटेल चालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने ही दगडफेक केल्याचे उघडकीस आले आहे. ठाणेदार संदीप पाटील यांनी मोठ्या शिताफीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

७ ऑक्टोबररोजी माही ट्रॅव्हल्सच्या बसवर दगडफेकीची घटना घडल्यानंतर बसचे मालक भिकुसिंह भानावत, रा. दिग्रस, जि. यवतमाळ यांच्या तक्रारीवरून बिबी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. देऊळगावकोळ भागात समृद्धी महामार्गावर ही घटना घडल्याने बिबी पोलिसांनी गांभीर्याने तपास सुरू केला व गुप्त माहितीच्या आधारे आरपी ट्रॅव्हल्सचा एजंट तेजराव उर्फ रवी सिरसाठ, रा. पार्डी याला सुलतानपुरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपूस केली असता, या गुन्ह्याचा उलगडा झाला. या गुन्ह्यात रामभरोसे हॉटेलचा मालक रामनारायण चव्हाण रा. खापरखेड घुले हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले असून, त्याचे साथीदार व तेथील कामगार शेख जावेद शेख शरीफ रा. बिबी, शुभम रामेश्वर आटोळे रा. बिबी हा रंगिला बारचा चालक यांनी माही ट्रॅव्हल्सवर दगडफेक केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. हे चारही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहेत. बिबी ते सुलतानपूर रोडवरील रामभरोसे हॉटेल येथे ट्रॅव्हल्स गाड्या थांबत नसल्याने धंदा होत नाही म्हणून या आरोपींनी ही दगडफेक केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील तपास ठाणेदार संदीप पाटील व त्यांचे सहकारी हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!