MEHAKARPolitical NewsPoliticsVidharbha

डॉ. ऋतुजा चव्हाण जनतेच्या मनातील उमेदवार; आता राजकीय समिकरणे बदलणार!

- मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात जनमाणसांतून जोरदार प्रतिसाद

डोणगाव (प्रतिनिधी) – विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच इच्छुक उमेदवार आपल्या पद्धतीने जोरदार कामाला लागले आहेत. मेहकर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले आहेत. यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची, याबाबत वरिष्ठांना मोठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मात्र, उमेदवारीची माळ कोणाच्याही गळ्यात पडो, पण महिला उमेदवार डॉ. ऋतुजा चव्हाण मेहकर विधानसभा मतदारसंघात राजकीय समिकरणे बदलवणार एवढे मात्र निश्चित आहे. त्यांना गावोगावी जोरदार प्रतिसाद लाभत असून, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

मेहकर मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणूक सध्या चांगलीच चर्चेत आहे. या ठिकाणी महायुतीकडून शिंदे गटाचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमुलकर यांची उमेदवारी निश्चित झालेली दिसत आहे. यांनी तीनवेळा चढत्या बहुमतांनी निवडून येऊन आमदारकीची हॅटट्रिक केली आहे. आता तर चौकार मारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातचं प्रशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेले शिवसेना नेते सिद्धार्थ खरात हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी मुंबई दौरे करीत आहेत. यामुळे यांचीही उमेदवारी जवळपास निश्चित होऊ शकते, अशी चर्चा आहे. सध्या निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. त्यांच अनुषंगाने अद्याप फायनल उमेदवारी कोणाची नसलीतरी डॉ. ऋतुजा चव्हाण जनतेच्या मनातील उमेदवार असल्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव विधानसभा निवडणूक लढविणार आहेत. मेहकर मतदारसंघात एक महिला उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढवणार तर आहेत. पण भविष्यात डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी निवडणूक तिसर्‍याच पक्षाकडून लढविल्यास याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे. हे सांगणे सध्यातरी कठीण आहे. मात्र, महिला उमेदवार या नात्याने सहानुभूतीची लाट उसळली तर मतदारसंघात परिवर्तन निश्चित होऊ शकते. तसे राजकीय समिकरणे बदलविण्यासाठी डॉ. ऋतुजा चव्हाण या सक्षम महिला उमेदवार आहेत. हे आजच्या राजकीय समिकरणावरुन चर्चा होत आहे.
एक महिला उमेदवार असतानासुद्धा त्या सातत्याने जनहितासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी समाजात पुढे असतात, एवढेच नाही तर, गोरगरिबांना मदतीचा आधार देत असतात. वंचितांच्या प्रगतीसाठी, शेतकर्‍यांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून या सर्वांचा आवाज बुलंद करून शासनदरबारी न्यायाची मागणी करीत असतात. अशा कर्तृत्ववान महिला डॉक्टर ऋतुजा चव्हाण जनतेच्या आग्रहास्तव आता मेहकर विधानसभा निवडणुकीत उतरल्या तर नक्कीच महायुतीच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी एक महिला उमेदवार या नात्याने आणि त्यांच्या कर्तृत्वाने मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलाव करू शकतात, अशी चर्चा जोर धरत आहे. एक महिला उमेदवार असल्यामुळे पहिल्या पसंतीचे उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण सध्यातरी त्यांचे नांव पुढे येत आहे. अशी संपूर्ण मतदारसंघात राजकीय चर्चा सुरू आहे. मेहकर मतदारसंघातही जनतेच्या मनामनात परिवर्तन करण्याची तयारी आहे. त्यामुळेच डॉ. ऋतुजा चव्हाण ह्या मतदारसंघात पर्याय म्हणून आपल्या पसंतीचे आणि जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण सक्षम आहेत. यावेळी डॉ. ऋतुजा चव्हाण नक्कीच राजकीय समिकरणे बदलाव करू शकतात, अशी मतदारसंघात चर्चा आहे.


डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी अपक्ष लढण्याची तयारी चालवली असली तरी, अनेक राजकीय पक्षांच्या नेतृत्वांशी सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नाव असलेले त्यांचे पती ऋषांक चव्हाण यांचे संबंध पाहाता, त्यांना एकाद्या राज्यस्तरीय पक्षाकडूनदेखील ऐनवेळी उमेदवारीची ऑफर येऊ शकते. तसेच, काही पक्षांकडूनदेखील त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील त्यांची लोकप्रियता, लोकांशी असलेला व्यापक संपर्क आणि जनमाणसातील त्यांची प्रतिमा पाहाता, त्या अपक्ष किंवा एखाद्या राजकीय पक्षाकडूनदेखील विजयश्री प्राप्त करू शकतात, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!