Head linesMEHAKARVidharbha

डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी आमदारकी लढवावी!

- जनसामान्यांचा सूर : मेहकर विधानसभा निवडणुकीसाठी ठरू शकतात एकमेव महिला उमेदवार!

– शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या तिसर्‍या आघाडीकडून उमेदवारीची शक्यता, मतदारसंघात ठरणार मातब्बर लढत!

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांच्या पत्नी डॉ. ऋतुजा चव्हाण यांचे नाव मेहकर विधानसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहे. राजमाता जिजाऊ सामाजिक फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणार्‍या डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी आमदारकी लढवावी, असा सूर सामान्य जनतेचा आहे. याबाबत मेहकर मतदारसंघातून दररोज अनेकांचे फोन त्यांना सुरू आहेत. सद्या या मतदारसंघातील राजकीय समिकरणे बदलली असून, सर्वसामान्य जनतेला विकासात्मक चेहरा नेतृत्व म्हणून हवा आहे. त्यादृष्टीने डॉ. ऋतुजा चव्हाण यांच्या नेतृत्वाला लोकमाणसातून प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे.

May be an image of 8 people and textडोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण हे शेतकरी नेते रविकांत तुपकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांचे निकटवर्तीय आहेत. लोकसभा निवडणुकीतील तुपकर यांच्या मतदानाची टक्केवारी बघता, त्यांनी विधानसभेसाठी दिलेल्या उमेदवाराचे नाव मतदारसंघात आघाडीवर असेल अशी चर्चा आहे. तसेच, ऋषांक चव्हाण यांनी शेतकरी संघटनेसाठी कधी पडद्यामागे राहून तर कधी समोर येऊन शेतकरीहितार्थ भूमिका घेतली आहे. त्यामुळे रविकांत तुपकरांच्या महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीकडून ऋषांक चव्हाण यांच्या पत्नी डॉ. ऋतुजा चव्हाण यांना तिकिट मिळणार असे बोलले जात आहे. त्यांना मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मिळाल्यास त्या एकमेव महिला उमेदवार ठरू शकतात. बहुजन समाजाला चालणारा व जवळीक असणारा तसेच अनुकूल चेहरा म्हणून मतदारसंघात हा उमेदवार असेल. या गोष्टीचा त्यांना फायदा होईल, अशी चर्चा आहे.
डॉ. ऋतुजा चव्हाण ह्या एमबीबीएस डॉक्टर आहेत. महिलांच्या समस्यांची त्यांना जाण आहे. शेतकरी कष्टकर्‍यांविषयी तळमळ आहे. त्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करतात. त्यामुळे सामान्य लोक त्यांच्यासोबत राहणार आहेत. डॉ. ऋतुजा चव्हाण ह्या दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करतात. त्यांचे वडील संजय गवई हे शिक्षक असल्याने त्यांना सरकारी कर्मचार्‍यांविषयी आस्था आहे. त्यांचे पती ऋषांक चव्हाण यांनी आतापर्यंतच्या वाटचालीत सकारात्मक कार्यावर भर दिला आहे. त्यांचे खूप मोठे नेटवर्क सगळीकडे आहे.May be an image of 1 person, road, crowd and text


वडील संजय गवई यांचाही दांडगा संपर्क आहे. विशेष म्हणजे, शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या माध्यमातून कष्टकरी शेतकरी समुहाची खूप मोठी ताकद डॉ. ऋतुजा चव्हाण यांना मिळेल, अशी सगळीकडे चर्चा आहे. मेहकर मतदारसंघात इतर उमेदवारांच्या तुलनेत स्थानिक उमेदवार म्हणून त्यांना अधिक पसंती मिळणार आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना या निवडणुकीत कडवे आव्हान देण्याची क्षमता असलेला हा उमेदवार असल्यामुळे संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष त्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचा लोकप्रिय आणि आश्वासक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मेहकर मतदारसंघातून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अद्याप उमेदवाराची घोषणा केली नसली तरी, ते डॉ. ऋतुजा चव्हाण यांनाच उमेदवारी जाहीर करतील, अशी चर्चा शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते करताना दिसत आहेत. तसे झाले तर दोन शिवसेनेच्या लढतीत, शेतकरी आमदार म्हणून डॉ. ऋतुजा चव्हाण यांनाच मोठे मताधिक्य मिळेल, असे या मतदारसंघात बोलले जात आहे.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!