BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात आ. शिंगणेंनी सर्वच इच्छूकांची धाकधूक वाढवली!

- गायत्री शिंगणे, डॉ. सुनील कायंदे, दिनेश गिते, दिलीप गिते यांचा जीवही अद्याप टांगलेला!

– शेजारच्या चिखली, मेहकर मतदारसंघात राजकीय वातावरण पेटले असताना, सिंदखेडराजात मात्र सामसूम!
– शेतकरी नेते रविकांत तुपकर खेळणार वंजारी कार्ड?; प्रकाश गितेंना संधी की तुपकर स्वतः उभे राहणार?

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. नव्हेतर मतदारसंघाला लागून असलेल्या मेहकर व चिखली मतदारसंघात उमेदवार व पक्ष यांच्यातील राजकीय स्पर्धा हायव्होल्टेज होत असल्याचे चित्र आहे. त्यामानाने मात्र जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघात उमेदवार व पक्ष यांची अजूनही ठाम भूमिका दिसून येत नसल्याने प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोण व लढत नेमकी कुणाकुणात होणार? याबाबत संभ्रमावस्था आहे. मुरब्बी राजकीय खेळाडू असलेले विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपण महायुती, की महाआघाडी की अपक्ष लढणार, याबाबत संभ्रमावस्था निर्माण करून इच्छूकांची धाकधूक वाढवून ठेवली आहे. तर लोकसभेला जोरदार लीड घेणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही शेतकरीपुत्राला आणि त्यातही वंजारी समाजाला उमेदवारी देण्याचे संकेत देऊन सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघात चांगलाच ट्वीस्ट निर्माण केला आहे.

सविस्तर असे, की मेहकर मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तेथे महायुतीचे विद्यमान आमदार डॉ. संजय रायमूलकर यांच्या शिंदे गट विरोधात प्रामुख्याने महाविकास आघाडी अशी लढत होणार असल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी मंत्रालयात सचिवपदापर्यंत पोहोचू शकणारे सिद्धार्थ खरात यांच्यासह अनेकांनी उमेदवारी मागितली आहे. उमेदवारी निश्चित समजून सिद्धार्थ खरात यांनी मेहकर येथे मुक्काम ठोकत प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यामुळे मुख्य लढत सध्यातरी डॉ. रायमूलकर व खरात यांच्यात होणार असल्याचे दिसून येते. चिखली मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार श्वेताताई महाले व महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्यात प्रमुख लढत होईल, असे चित्र आहे. नव्हेतर गेल्या पाच वर्षांत रोजच दोन्ही बाजूकडून आरोप प्रत्यारोप, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या फोडाफोडीचे राजकारण आदि अनेक प्रकारांचे राजकीय चित्र दिसून येते. या दोन्ही मतदारसंघांमध्ये सध्याचे दिसणारे चित्र असे असले तरी, महायुती, महाविकास आघाडी यांच्यासह इतरही राजकीय पक्ष, संघटना यांचे वरिष्ठ नेते वेळेवर जी भूमिका घेतील, त्याप्रमाणे राजकीय परिस्थितीतसुध्दा बदल होऊ शकतो. दोन्ही मतदारसंघांत प्रचारात्मक प्रक्रियेचा धुरळा उडत असल्याचे चित्र असतांनाच मात्र सिंदखेडराजा मतदारसंघात गोंधळात्मक राजकीय परिस्थिती दिसून येत आहे.

Gayatri Shingne | तुमचा काय आणि माझा काय शेवटी बाप तो बाप असतो सगळे जणी वरवर असले तरी हा एकटाच खास असतो वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा❤️😊🤗 | Instagramमहायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे यांचे सुपुत्र डॉ. सुनील कायंदे यांनी लढण्याचे निश्चित केले आहे. परंतु त्यांचा पक्ष कोणता? हे नेमकेपणाने अधोरेखित झालेले नाही. याचवेळी वंचित बहुजन आघाडीकडून सौ. सविताताई मुंढे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मागील राजकीय कारणे जाणून घेतली असता, आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपली कृती व वाचा याद्वारे उर्वरित सगळ्याच इच्छुकांची कोंडी करण्यात यश मिळविल्याचे आढळून येते. त्यातून डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे राजकीय कसब अनुभवास येते. आपण नेमके महायुतीकडून, महाविकास आघाडीकडून की वेळेवर भूमिका बदलून अपक्ष उमेदवार म्हणूनही उभे राहू शकतो, असे राजकीय चित्र निर्माण करण्यात, पट्टीचे राजकीय तज्ज्ञ समजले जाणारे आमदार डॉ. शिंगणे हे यशस्वी ठरले आहेत. याचवेळी देशपातळीवर अर्थतज्ज्ञ असलेले डॉ. नरेश बोडखे, मनोज कायंदे, गायत्री शिंगणे, प्रशासनात अधिकारी राहिलेले दिनेश गीते, अनिल देवलाल सावजी, प्रमोद घोंगे, बद्री बोडखे, महेंद्र पाटील, दिलीप वाघ व इतर काहीजण महाविकास आघाडीकडून तर विनोद वाघ, डॉ. सुनील कायंदे, डॉ. गणेश मांटे व इतर काही महायुतीकडून उमेदवारीसाठी प्रयत्नरत आहेत.


लोकसभा निवडणूक लढलेले व सिंदखेडराजा येथे नुकतेच शेतकर्‍यांसाठी उपोषण आंदोलन करणारे रविकांत तुपकरांनीसुद्धा शेतकरी पुत्राला विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे ते स्वतः निवडणूक लढविणार की प्रकाश गीते यांना उमेदवारी देणार? याबाबतही राजकीय चर्चा आवर्जून आढळतात. याचवेळी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर व मतदारसंघात विविध कार्यक्रम राबविणारे व भेटी घेण्यात आघाडीवर असलेले युवा नेते योगेश जाधव हे दोघे युती व आघाडीच्या संपर्कात असल्याचे राजकीय सूत्रांकडून कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!