सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील जागदरी येथील सुपुत्र राहुल गजानन सांगळे यांची इंडियन आर्मीमध्ये नुकतीच निवड झाली आहे. या निवडीमुळे गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी त्यांची गावातून मिरवणूक काढली.
राहुल सांगळे यांची इंडियन आर्मीमध्ये निवड होताच, गावांमध्ये त्याची डीजे लावून आनंद साजरा करण्यात आला. राहुल याने अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे यश मिळवले आहे. राहुल याला सुरुवातीपासूनच देशसेवा करण्याची आवड निर्माण झाली होती. तो दोन वर्षापासून सैन्यदलामध्ये भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. राहुल याचे वडील गजानन सांगळे हे शेती करतात. त्यांनीसुद्धा राहुलला इंडियन आर्मीमध्ये भरती होण्यासाठी प्रोत्साहित केले व त्याला ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता होती, त्या सर्व गोष्टीची पूर्तता त्यांनी शेतीमध्ये कबाडकष्ट करून केली. तसेच गजानन सांगळे यांची मुलगीसुद्धा ही बी.डी.एस.ला आहे. त्यांनी अत्यंत कबाडकष्ट करून आपल्या दोन्ही मुलांना शिकवले आहे. राहुल याची इंडियन आर्मीमध्ये भरती झाल्याची बातमी गावांमध्ये पसरतात आनंदाचे वातावरण निर्माण झाले व सर्व गावकरी मंडळी यांनी त्याचे अभिनंदन केले व गावांमध्ये मिरवणूक काढली. त्यामुळे नवीन मुलांना सैन्यामध्ये भरती होण्याची प्रेरणा मिळेल.