BULDHANAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

सिंदखेडराजा तालुक्यातील दोन मंडळात अतिवृष्टी!

- तत्काळ पंचनामे करून करुन नुकसान भरपाई द्या; तहसीलदारांना निवेदन

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – गेल्या तीन दिवसांपासून सिंदखेडराजा आणि किनगावराजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून, शासनाने यांची दखल घेतली नाही. अतिवृष्टी झालेल्या भागाचा सर्वे करून कपाशी आणि सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना मदत द्यावी. अन्यथा, शासनाने शेतकर्‍यांवर गोळ्या झाडाव्यात, अशा प्रकारचे निवेदन शेतकर्‍यांनी तहसीलदार अजित दिवटे यांना दिले आहे.

सिंदखेडराजा तालुक्यातील सिंदखेडराजा आणि किनगावराजा मंडळात सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांना अद्याप शासनाकडून कुठल्याही मदतीचा आश्वासन मिळाले नाही. म्हणून आम्हाला एक तर मदत द्या, नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा. याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. म्हणून आज शेतकरी मित्र सिंदखेडराजा आणि शेतकरी योद्धा कृषी समिती बुलढाणा जिल्हा यांच्यावतीने दिनांक २६ सप्टेंबररोजी तहसीलदार यांना निवेदन देऊन या मंडळामध्ये २३, २४ आणि या तीन दिवसात सिंदखेडराजा मंडळामध्ये व किनगावराजा मंडळामध्ये सतत तीन दिवस अतिवृष्टी झालेली आहे. सदर अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांची अतोनात नुकसान झालेले आहे. सोयाबीनचे नुकसान १०० टक्के झाल्याचे दिसत असून, कपाशीचेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, त्याला या नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे. योग्य ती कारवाई करून सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन झालेले नुकसान भरपाई शेतकर्‍याला कशी मिळेल, यासाठी आपण स्वतः तात्काळ पाठपुरावा करावा, अशी विनंती शेतकरीमित्र दिलीपभाऊ चौधरी व शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक बालाजी सोसे यांनी केली आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या परिसरामध्ये दि.२४ सप्टेंबररोजी ३१:०५ मिली व दिनांक २५ सप्टेंबर ६७:७ मिली दिनांक २६ सप्टेंबर ३८ :०८ मिली पाऊस पडला. किनगावराजा महसूल मंडळ येथील पर्जन्यमापक यंत्रणा पूर्णपणे बंद असून, संबंधित तालुका कृषी अधिकारी पंचाळ यांनी त्या यंत्रणेचा पंचनामा केला आणि त्याच पंचनामांमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की, संबंधित सिंदखेडराजा येथील रेन फॉल रिपोर्ट हे किनगावराजा मंडळाला लागू करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते आणि सिंदखेडराजा महसूल मंडळाचाच नियम लावून किनगावराजा मंडळाला मदत मिळावी. त्यामुळे आपण संबंधित कर्मचार्‍यांना पंचनामा करण्याचे आदेश काढण्यात यावे जर आपण या अतिवृष्टीची माहिती शासनापर्यंत पोहचवली नाही किंवा संबंधित अधिकार्‍यांपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही तर या सिंदखेडराजा मंडळातील व किनगावराजा मंडळातील शेतकरी ताबडतोब येत्या तीन दिवसांमध्ये सर्व शेतकरी धरणे आंदोलन करणार आहे. तरी आपण योग्य ती काळजी घेऊन या अतिवृष्टी पावसासंदर्भात शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात यावी, करिता आपणास निवेदन देण्यात आले आहे. सरकारचे लक्ष वेधले. यावेळी शेतकरी मित्र दिलीपभाऊ चौधरी शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक बालाजी सोसे, शेतकरी गोविंदराव टेके, जनार्दन मुंडे, विशाल मुंडे, उद्धव मुंडे, नरसिंग सोसे, दत्तात्रय झोरे, सुभाष मुंडे, दत्तात्रय बोडके, देवानंद सोसे, गणेश मुंडे, जगदीश मुंडे, संदीप राऊत, हसन शेख यासह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!