Head linesPolitical NewsPolitics

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार बांधणी!

- चित्रांगण खंडारे अकोला, अविनाश उमरकर बुलढाणा तर राजेंद्र मुळक रामटेकचे समन्वयक

– राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात नेमले निरीक्षक व समन्वयक

बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीतील अनपेक्षित यशानंतर काँग्रेसमध्ये धुमारे फुटत असल्याचे दिसत असून, आता विधानसभाही ताकदीने लढायची व जिंकायची असा निर्धार केल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्याने पक्षाने राजकीय कामाला गती दिल्याचे दिसत असून, याच दृष्टीने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाकडून निरीक्षक व त्यांच्या मदतीला प्रदेश काँग्रेसकडून समन्वयकांची नियुक्ती दि. २४ सप्टेंबररोजी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, निरीक्षक हे बाहेर राज्यातील असल्याचे दिसून येत आहे. किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रांगण खंडारे यांची अकोला, अविनाश उमरकर यांची बुलढाणा तर राजेंद्र मुळक यांची रामटेक लोकसभेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Imageकाही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले. त्यामुळे पक्षाचे हौसले आता आणखी बुलंद झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसावर येऊन उभी असलेली विधानसभा निवडणूक पाहता, अखिल भारतीय काँग्रेसने नियुक्त केलेल्या ४८ निरीक्षकांच्या मदतीला प्रदेश काँग्रेसने तेवढेच समन्वयक नियुक्त केले आहेत. यामध्ये नंदूरबार (अ.जा.) लोकसभेसाठी खा. गणीबेन ठाकूर यांची निरीक्षक तर दिलीप नाईक यांची लोकसभा समन्वयक, धुळे नौशाद सोळंकी व राजीव पाटील, जळगाव जुगल प्रजापती व सुभाष जाधव, रावेर बिपीन वानखेडे व जमील शेख, बुलढाणा दिनेश गुर्जर व अविनाश उमरकर, अकोला कमलेश्वर पटेल (सीडब्ल्यूसी सदस्य) व चित्रांगण खंडारे, अमरावती (अ.जा.) श्रीमती कोटा नीलिमा व हरिभाऊ मोहोळ, वर्धा हिना कावरे व डॉक्टर धर्मपाल ताकसांडे, रामटेक (अ.जा.) राजकुमार खुराना व माजी मंत्री डॉ. राजेंद्र मुळक, नागपूर सुखदेव पानसे व विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया डॉ.शिवकुमार देहलिया व राजू पालीवाल, गडचिरोली चिमूर बिलाह नाईक व डॉ. महेंद्र ब्राह्मणवाडे, चंद्रपूर चामला किरणकुमार रेड्डी व विनोद दत्तात्रय, यवतमाळ वाशिम खा. रवी मालू व अशोक बोबडे, हिंगोली आ. टी. राममोहन रेड्डी व भगवानराव देशमुख, नांदेड खा. सुरेश कुमार शेटकर व श्याम दारक, परभणी महेश शर्मा व बाळासाहेब देशमुख, जालना पी सी शर्मा व राजेंद्र राख, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) आ. इमरान खेडा वाला व डॉ. जाफर खान, दिंडोरी आ. अनंत पटेल व रमेश कहांडोळे, नाशिक परेश धनाने व राजाराम पानगव्हाणे, पालघर सुखराम राठवा व विजय पाटील, भिवंडी ईवन डी.सु व सोहेल खान, कल्याण राजपाल भिस्त व भारत टाकेकर, ठाणे आ. संजू जोशी व राहुल पिंगळे, रायगड हझिना सय्यद व प्रवीण ठाकूर, मावळ श्रावण कुमार व निखिल कवीश्वर, पुणे जगदीश ठाकुर व अजित दरेकर, बारामती सत्यवीर अरोरिया व लहूअण्णा निवगाणे, शिरूर जेट्टी कुसुम कुमार व महेश दामोदर, अहमदनगर इंद्रविजय गोहिल व प्रशांत दरेकर, शिर्डी आ. रिता चौधरी व संतोष हासे, बीड गिडूगू रुद्र राजू व नवनाथ थोटे, उस्मानाबाद (धाराशिव) इंद्रज गुज्जर व अग्निवेश शिंदे, लातूर वसंत कुमार व डॉ. किरण जाधव, सोलापूर विनय कुलकर्णी व केशव इंगळे, माढा आ. अमृत कुमार व दादासाहेब साठे, सांगली आ. बी आर पाटील व प्रमोद सूर्यवंशी, सातारा विनयकुमार सोरके व डॉ .सुरेश जाधव, रत्नागिरी सिंधुदुर्ग देशराज मीना व अजिंक्य देसाई, कोल्हापूर आ. हसन मौलाना व तौफिक मुलानी तर हातकणंगले लोकसभेसाठी निरीक्षक म्हणून साके सेलजनाथ व समन्वयक म्हणून शशांक बावचकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व संबंधितांना तातडीने कामाला लागण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!