Breaking newsHead linesPoliticsWorld update

राहुल गांधी यांची ५ तासांहून अधिककाळ चौकशी

– पी. चिदंबरम यांना पोलिसांची अपमानास्पद वागणूक; काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोमवारी ईडीने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची सुरुवातीला तब्बल तीन तास चौकशी केली. त्यानंतर रुग्णालयात असलेल्या आई सोनिया गांधी यांची भेट घेऊन परतल्यानंतर पुन्हा तब्बल पाच तासांहून अधिककाळ चौकशी सुरु होती. ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने देशभर तीव्र आंदोलन केले. तसेच, काँग्रेस नेत्यांनी ईडीसह केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
ईडीच्या अधिकार्‍यांनी राहुल गांधी यांना तब्बल ५० प्रश्न विचारले. या प्रश्नांची राहुल गांधी यांनी कायदेशीररित्या उत्तरे दिली. दुसरीकडे, या चौकशीचा काँग्रेसने देशभर निषेध केला. राहुल गांधी झुकणार नाहीत, असे पोस्टर चोहीकडे झळकत होते.
दरम्यान, काँग्रेस नेते खासदार पी. चिंदबरम यांच्यासोबत पोलिसांनी गैरव्यवहार केल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. सायंकाळी काँग्रेसने साडेपाच वाजता प्रमुख नेत्यांना मुख्यालयात बोलावून पुढील रणनीती निश्चित केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!