Head linesSINDKHEDRAJAVidharbha

शेतकरी मित्र दिलीप चौधरी व शेतकरीयोद्धा बालाजी सोसे ३० सप्टेंबररोजी करणार आत्मदहन?

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – ठिबक व तुषार सिंचनाचे २०२३-२०२४ मधील प्रलंबित अनुदान तात्काळ द्या, तसेच पीकविमा संपूर्ण सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्‍यांना सरसकट द्या, नाही तर ३० सप्टेंबररोजी कुणाचेच काही ऐकणार नाही, व आत्मदहन आंदोलन करू, असा इशारा शेतकरीमित्र दिलीपभाऊ चौधरी व शेतकरीयोद्धा बालाजी सोसे यांनी दिलेला आहे.

तहसील कार्यालयावर निघालेला मोर्चा आणि मोर्चाला संबोधित करताना बालाजी सोसे.

सन २०२४ करिता शेतकर्‍यांनी ठिबक व तुषार िंसचनासाठी केलेल्या अर्जाची लॉटरी निवड करून व पूर्वसंमती देऊन अनुदान मिळण्यासाठी शेतकरी अर्ज ऑनलाईन करूनसुद्धा सरकारच्या हलगर्जीपणामुळे सध्या शेतकर्‍यांना ठिबक व तुषार मिळण्यास विलंब होत आहे. दिलीप चौधरी व बालाजी संतोबा सोसे व महाविकास आघाडी तसेच तहसील कार्यालयामार्फत शासनाकडे २९ ऑगस्टलावरील संदर्भात आपणास निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु, सदर निवेदनाबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे दिनांक ९ सप्टेंबररोजी बैलगाडी व ट्रॅक्टर मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते.

ठिबक व तुषार सिंचनाची वापर करून पाणी, खत, वीज ,मजूर, बचत करून शेतमालाचे अधिक व दर्जेदार उत्पादन यावेत, म्हणून शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करीत आहे. केंद्र व राज्य सरकार द्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रती थेंब अधिक पीक अंतर्गत शेतकर्‍यांनी सण २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर्जाचे पैसे काढून काही शेतकर्‍यांनी स्वतःची गुंतवणूक करून अनुदान मिळते म्हणून ठिबक व तुषार संच खरेदी केलेले आहेत. परंतु शासनाने पूर्वसंमती देऊनही आजपर्यंत शेतकर्‍याला गेल्या दीड ते दोन वर्षापासून अनुदान दिले नाही.

तरी या थकीत शेतकर्‍यांना अनुदान देण्यात यावे, तसेच काही शेतकर्‍यांनी सन २०२४-२५ मध्ये नवीन अर्ज केलेले आहेत. या आर्थिक वर्षामध्ये ठिबक व तुषार सिंचन साठी लॉटरी होऊन निवड झालेली नाही. ही योजना ठप्प आहे तरी पूर्वसंमतीची प्रतिक्रिया पूर्ण करून द्यावी. जेणेकरून संच घेऊन पिकास योग्य पाणी व खत देण्यास शेतकरी यांना नियोजन करता येईल. त्याचप्रमाणे रिजेक्ट केलेल्या शेतकर्‍यांचे पीक विमा अर्ज रिऐक्टिव करावे, व रद्द केलेले पिक विमा अर्जाचा सरसकट पिक विमा शेतकर्‍यांना मिळावा. व तसेच ज्या मंडळामध्ये राज्य सरकारने शेतकर्‍यांची नुकसान भरपाईची गारपीटीची मदत दिली त्या ठिकाणी सरसकट पिक विमा देण्यात यावा, ऑनलाईन असो अगर नसो कारण अर्ज ऑनलाईन करते वेळेस साईट बंद होती.

ऑफलाईन अर्ज घेतले नाही म्हणून अशा शेतकर्‍यांनी काय करायचे जर वरील प्रमाणे पंधरा दिवसात शेतकर्‍यांचे ठिबक /तुषारचे थकीत अनुदान व रद्द झालेले शेतकर्‍यांचे पीक विमा रक्कम मिळाली नाही तर शेतकरी मित्र दिलीप चौधरी, शेतकरी योद्धा श्री बालाजी सोसे दिनांक ३०/०९/२०२४ शासनाच्या विरोधात आत्मदानाचा इशारा देत आहे. तरी शासनाने याची दखल घेऊन त्वरित शेतकर्‍यांची अनुदान व विम्याची रक्कम अदा करावी, अशी मागणीही या दोघांनी केलेली आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!