Head linesWorld update

रेशनवरील तांदूळ बंद; गहू, डाळींसह ९ वस्तू मिळणार!

– केंद्र सरकारने तडकाफडकी घेतला निर्णय

नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – केंद्रातील मोदी सरकारने देशातील तब्बल ९० कोटी रेशन कार्डधारकांना जोरदार धक्का दिला आहे. रेशनवरील तांदूळ बंद करण्यात आला असून, त्याऐवजी गहू, डाळी व इतर नऊ वस्तू मिळणार आहेत. रेशन कार्डधारकांना मोफत रेशन योजनेंतर्गत रेशनही पुरविले जाते. मात्र आता यात मोठा बदल करण्यात आला असून, त्यानुसार रेशनवरील मोफत तांदूळ बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी इतर ९ जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. यामध्ये गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे.

Ration Card के लाभार्थियों की आई मौज, अब फ्री मिलेगा 150 किलो चावल .Ration card beneficiaries enjoyed, now they will get 150 kg rice for free - News Nationमोदी सरकारने तिसर्‍यांदा सत्तेत येण्याअगोदर पुढील ५ वर्षे मोफत धान्य पुरविण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता देशातील जनतेला पुढील पाच वर्षे मोफत धान्य मिळेल, असा विश्वास होता. परंतु केंद्र सरकारने या योजनेत बदल करून आता मोफत मिळणारा तांदूळ बंद केला आहे. याऐवजी आहारातील पोषणाची पातळी लक्षात घेऊन इतर ९ वस्तूंचा समावेश केला आहे. त्यामुळे यापुढे आता तांदळाऐवजी अन्य वस्तू मिळतील, असे सांगण्यात आले. केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेअंतर्गत जवळपास ९० कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. यामध्ये लोकांना पूर्वी मोफत तांदूळ दिला जात होता. मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे मोफत तांदूळ मिळणे बंद होणार आहे. त्याव्यतिरिक्त गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले या वस्तू मिळणार आहेत. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि त्यांच्या आहारातील पोषणाची पातळी वाढविण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकांचे जीवनमानही सुधारेल, अशी सरकारला आशा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!