Breaking newsBuldanaBULDHANAChikhaliCrimeHead linesLONARMaharashtraSINDKHEDRAJAVidharbha

चिखली अर्बन बँकेतून शेतकर्‍याचे दीड लाख पळविले!

साखरखेर्डा (अशोक इंगळे) – राताळी येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर तेजराव पाटील हे येथील चिखली अर्बन बँकेत कर्जाचे पैसे भरण्यासाठी गेले असता, त्यांच्या मागावर असलेल्या दोन चोरट्यांनी थैलीला धारदार ब्लेडने कट मारुन थैलीतील १ लाख ५० हजार रुपये उडविल्याची घटना आज (दि.३०) दुपारी दीड वाजता घडली. उपरोक्त चोरीची घटना घडताच बँकेत एकच खळबळ माजली होती. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली असून, चोरटादेखील ठळकपणे दिसून येत आहे.

राताळी येथील ज्ञानेश्वर तेजराव पाटील यांनी नेट शेती करून बीजवाई घेतली होती. त्यांचे पेमेंट भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात जमा झाले होते. भारतीय स्टेट बँकेतून ५ लाख रुपये काढून तीन लाख रुपये चिखली अर्बन बँकेच्या कर्ज खात्यात जमा करण्यासाठी ज्ञानेश्वर तेजराव पाटील हे गेले. भारतीय स्टेट बँकेत पैसे काढताना अज्ञात तीन चोरट्यांनी त्यांना पाहिले होते. त्यांचा पाठलाग करीत ते तिघे चोरटे चिखली अर्बन बँकेत आले. ज्ञानेश्वर पाटील यांनी पैसे भरण्यासाठी स्लीप भरताना दोघेही चोरटे त्यांना खेटून उभे राहिले. ज्ञानेश्वर पाटील कॅश काऊंटरवर पैसे जमा करताना उपरोक्त दोघे त्यांच्या मागे उभे राहिले. तीन लाख रुपये बँकेत जमा करताना त्यातील एका चोरट्याने धारदार ब्लेडच्या सहाय्याने थैलीला कट मारुन थैलीतील एक लाख ५० हजार रुपये घेऊन बँकेतून पलायन केले. ही सर्व घटना बँकेच्या कॅश काउंटरवर असलेल्या कॅमेर्‍यामार्फत सीसीटीव्हीत वैâद झालेली आहे. या चोरीबाबत शेतकरी ज्ञानेश्वर पाटील यांनी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज साखरखेर्डा येथील आठवडी बाजार असल्याने आणि शेतकर्‍यांचा महत्त्वाचा पोळा सण सोमवारला येत असल्याने शेतकर्‍यांची बाजारात मोठी गर्दी होती. काही शेतकरी बँकेतून पैसे काढून आपला व्यवहार करीत असतात. आज साखरखेर्डा बाजारात चांगली गर्दी होती, त्याचा गैरफायदा चोरट्यांनी चांगलीच हातसफाई केली आहे. दरवर्षी अशाप्रकारच्या चोर्‍या सणासुदीच्या काळात होत असून, चोरटे आपल्या हातचलाखीने अनेकांचे खिसे रिकामे करतात. काही महिलांच्या अंगावरील दागिने, मोबाईलदेखील हे चोरटे हात चलाखीने लंपास करतात. याबाबत पोलिसांनी तातडीने या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे आली आहे.


शेतकर्‍याची पांढर्‍या रंगाच्या शर्ट घातलेल्या व्यक्तीने थैलीला कशाचा तरी कट मारून दीड लाख रोख रक्कम चोरून घेतली असून, सदरबाबत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मोठी रक्कम ही कॅश काऊंटरवर न घेता बँक मॅनेजर यांच्या केबिनमध्ये घेतल्यास अशा घटना घडणार नाही. तसेच बँक मॅनेजर यांना लेखी सूचना देण्यात येतील, कोणत्याही व्यक्तीवर संशय आल्यास त्वरित पोलीस स्टेशन साखरखेर्डा यांच्याशी संपर्क साधावा. जास्त प्रमाणात कॅश बँकेतून काढताना तसेच सोबत नेताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच फुटेजमधील व्यक्ती कुठे दिसल्यास पोलीस स्टेशन साखरखेर्डा यांच्याशी संपर्क करावा.
– गजानन करेवाड, पोलीस स्टेशन साखरखेर्डा (संपर्क – ७९७२४४६८३६)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!