BULDHANAChikhaliHead linesVidharbha

स्वतःचे पैसेही मिळत नाही! संतप्त शेतकर्‍यांचे सरनाईक यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र बँक मेरा शाखेत ठिय्या आंदोलन

– गावातील सीएसपी व इतर सेंटरवर पैसे निघत नसल्याने ‘लाडक्या बहिणीं’च्याही बँकेत भल्यामोठा रांगा

चिखली (तालुका प्रतिनिधी) – महाराष्ट्र बँक शाखा मेरा यांनी आंचरवाडी येथील शेतकर्‍यांच्या खात्याला होल्ड लावल्याने शेतकर्‍यांना गावामध्ये पैसे काढले जात नाहीत. बँकेत मात्र पैसे काढले जात असल्याचे समोर आले आहे. शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड व त्रास सोसावा लागत असून, गावातील सेंटरला पैसे काढले जात नसल्याने बँकांमध्ये गर्दी होतांना दिसत आहे. या प्रकरणी शेतकर्‍यांनी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना समस्या सांगितल्या असता, विनायक सरनाईक, तानाजी चिकणे, कुंदन यंगड यांच्यासह शेतकर्‍यांनी महाराष्ट्र बँक शाखा व्यवस्थापक यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या अडचणी सुटणार नाही, तोपर्यंत बँक सोडणार नसल्याची भूमिका शेतकर्‍यांसह सरनाईक यांनी घेतली. या समस्यांप्रकरणी वरिष्ठांना ईमेलव्दारे कळविण्यात आले असल्याचे बँक व्यवस्थापक यांनी सांगितले. दुसरीकडे, बँकांकडून सक्तीची वसुली होत असल्याचा आरोपही शेतकरीवर्गाने केला आहे.

दरम्यान इतर बँकांकडून गावपातळीवर पैसे काढले जातात. परंतु वयोवृद्ध लोकांना शासकीय योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेतच यावे लागत असल्याने मोठी हेळसांड व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शासनाच्या विविध योजना त्याचप्रमाणे नुकसान भरपाईचे पैसे खात्यावर आले आहेत. परंतु यापूर्वी गावामध्ये निघणारे पैसे निघत नसल्याने शेतकरी व सर्वसामान्य नागरीक अडचणीत सापडले आहेत. अनेकांना पैसे काढण्यासाठी बँकेत यावे, अशा सूचना बँकेकडून दिल्या जात असून, वयोवृद्धांना स्पेशल वाहन करून पैसे काढावयास यावे लागत असल्याने बँकेप्रती प्रचंड रोष निर्माण होतांना दिसत आहे. यावेळी तानाजी चिकणे, कुंदन यंगड, नामदेव सपकाळ, विलास परीहार, संजय परीहार, संजय गुप्ता, पुंजाजी कोल्हे, कासाबाई खरात, लक्ष्मीबाई शिंदे, वसुदेव परीहार, रघुनाथ भवर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
———

दवाखाण्याचे काम पडल्यास पैसे काढण्यास बँकेत यावे का?

शेतकर्‍यांना पैसे काढावयाचे असेल तर बँकेत येवूनच ते काढावे लागेल. आधार बेसवर पैसे काढण्यासाठी अडचणी आहेत. साईडचा वरूनच प्रॉब्लेम असल्याचे उत्तरे शेतकर्‍यांना मिळत असल्याने शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकरी आक्रमक झाले होते. दवाखान्याचे काम पडल्यास पहिले बँकेत यावे, बाजार करावयाचा किंवा फी भरणा करावयाचा तर पहिले बँकेत यावे का? असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!