– सुनील कडासणे यांची जेथे कारकिर्दीची सुरूवात तेथेच कारकिर्दीचा समारोप
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य सरकारने १७ आयपीएस अधिकार्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात ११ अप्पर पोलिस अधीक्षकांच्याही बदल्या करण्यात आलेल्या आहेत. बुलढाणा पोलिस अधीक्षक सुनील कडासणे हे ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने त्यांच्या रिक्त जागेवर विश्व पानसरे हे आले आहेत. पानसरे हे सद्या नागपूर गुन्हे अन्वेषण विभागात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. कडासणे यांची कारकिर्दीची सुरूवातच पोलिस उपाधीक्षक म्हणून बुलढाणा जिल्ह्यातून झाली होती. आणि योगायोगाने त्यांची सेवानिवृत्तीही बुलढाण्यातच होत आहे. एक संवेदनशील, लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकिर्दी यशस्वी केली आहे. मुस्लीमबहुल व संवेदनशील परिसरात त्यांनी केलेली यशस्वी कामगिरी हा नेहमीच गौरवाचा विषय राहिलेला आहे. सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांची बदली मुंबई पोलीस उपायुक्तपदी झाली आहे. तर अतुल कुलकर्णी यांची बदली सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने काढलेले बदल्यांचे आदेश –
– अतुल कुलकर्णी – पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण
– श्रीकृष्ण कोकाटे – पोलीस अधीक्षक, हिंगोली
– सुधाकर बी. पठारे – पोलीस अधीक्षक, सातारा
– अनुराग जैन – पोलीस अधीक्षक, वर्धा
– विश्व पानसरे – पोलीस अधीक्षक, बुलढाणा
– शिरीष सरदेशपांडे – पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे
– संजय वाय. जाधव – पोलीस अधीक्षक, धाराशीव
– कुमार चिता – पोलीस अधीक्षक, यवतमाळ
– आंचल दलाल – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, गट क्र.१, पुणे
– नंदकुमार ठाकूर – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड
– नीलेश तांबे – प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर
– पवन बनसोड – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, अमरावती
– नुरुल हसन – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.११, नवी मुंबई
– समीर अस्लम शेख – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
– अमोल तांबे – पोलीस अधीक्षक/दक्षता अधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे
– मनिष कलवानिया – पोलीस उप आयुक्त, मुंबई शहर
– अपर्णा गिते – कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमलबजावणी), महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मुंबई
————–