Head linesLONAR

मी माणसं जपणारा कार्यकर्ता; मतदारसंघातील सर्व जातीधर्माचे लोकं माझे दैवत; आ.डॉ.रायमुलकरांचे भावूक उद्गार!

– आगळा वेगळा कार्यक्रम आयोजनासाठी सरपंच संदीप अल्हाट यांचे केले कौतुक!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मतदारसंघातील कोणाचीही समस्या सोडविण्यासाठी मी चोवीस तास ‘अलर्ट’ असतो. काम करताना मी कधीच जात धर्माला थारा देत नाही, मतदारसंघातील सर्व जातीधर्माचे लोक माझे दैवत असून, मी माणसं जपणारा एक कार्यकर्ता आहे, असे प्रतिपादन आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी केले. विशेष म्हणजे, भाषणादरम्यान आ. संजय रायमुलकरांना अश्रू अनावर झाले होते. तुम्हीच माझे राजकीय भवितव्य घडवल्याने मतदारसंघातील जनतेच्या कायम ऋणात राहील, असे सांगून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर मतदारसंघात कोट्यवधीची विकास कामे केली असून, भविष्यात मतदारसंघात आणखी बदल घडवू, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. शालेय साहित्यवाटप कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल सरपंच संदीप अल्हाट यांचे तोंडभरून कौतुकदेखील त्यांनी यावेळी केले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत मेहकर मतदारसंघाचे आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप तसेच सत्काराचा कार्यक्रम सरपंच संदीप अल्हाट यांनी ५ ऑगस्टरोजी आयोजित केला होता. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर बोलत होते.

यावेळी युवासेना तालुका प्रमुख भूषण घोडे, डॉ. हेमराज राठी, सरपंच तथा आयोजक संदीप अल्हाट, माजी जिल्हा परिषद सदस्य तेजराव जाधव, माजी उपसभापती सुपाजी पायघन, सर्कल प्रमुख रोहिदास जाधव, भाजपनेते गजानन अल्हाट, ज्येष्ठ पत्रकार तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सहसंपादक बाळू वानखेडे, ग्रामपंचायत सदस्य रणजीत देशमुख, ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना शहर प्रमुख शेख अब्रार, वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश परीहार, सरस्वती आश्रम शाळा मुख्याध्यापक शंकरराव परीहार, रामचंद्र चव्हाण, पत्रकार गणेश पाटील, विजय चव्हाण, रितेश जैन, बी.एम. राठोड, मोहना उपसरपंच सुरेश आडे, देविदास समुद्रवार, रमेश बाजड, शाळा समिती अध्यक्ष विठ्ठल लाड, गौरव देशमुख, मुख्याध्यापक गोपाल बावने, एजाज सर, गणेश अल्हाट, मोतीलाल चव्हाण, ना. देशमुख उपसरपंच सुरडकर, मराठी व उर्दू शाळा समिती पदाधिकारीसह आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

भाजपनेते गजानन अल्हाट यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. यावेळी आ. डॉ. संजय रायमुलकर व मान्यवरांच्याहस्ते ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्यात आली. श्रीमती जे. डी. पवार यांची विस्तार अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल तसेच कु. प्राची ठाकरे हिची नेव्हीमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा तसेच इतरही गुणवंतांचा आ. रायमुलकर यांच्याहस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. समाजाचे काही देणे लागते, या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सरपंच संदीप अल्हाट यांचे आ. डॉ.संजय रायमुलकर यांनी तोंडभरून कौतुकदेखील केले. विविध संघटना, कर्मचारी व गावकरी यांनी आ.रायमुलकर यांचा यावेळी सत्कार केला. कार्यक्रमाचे संचलन मुख्याध्यापक गोपाल बावणे तर आभार प्रदर्शन शिक्षक होणे यांनी केले. जि.प. मराठी, उर्दू तसेच सरस्वती आश्रम शाळा शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच कृष्णा चव्हाण, सागर पायघन, सोहेल खानसह आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक, गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!