BULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप!

– देऊळगाव साखरशाला आ. रायमुलकरांकडून भरघोस निधी, तब्बल १५ कोटींची विकासकामे!
– रस्ते, पूल, सभागृह, शादीखाना, सामाजिक न्याय, पर्यटनसह इतरही कामांना प्राधान्य!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – मेहकर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. संजय रायमुलकर यांचा आज, दि. ३ ऑगस्टरोजी वाढदिवस. यानिमित्ताने मतदारसंघात विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे सरपंच संदीप अल्हाट यांच्या पुढाकाराने येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप सोमवार, दि. ५ ऑगस्ट रोजी आ.डॉ.संजय रायमुलकर यांच्याहस्ते व सरपंच संदीप अल्हाटसह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या विशेष प्रयत्नातून देऊळगाव साखरशा येथे रस्ते, पूल, सभागृह, शादीखाना, सामाजिक न्याय, पर्यटनसह इतर अशी १५ कोटींची विकासकामे करण्यात आली आहेत.

देऊळगाव साखरशा तसे मेहकर विधानसभेतील शेवटचे गाव. परंतु आ. डॉ. संजय रायमुलकर यांचे या गावाकडे विशेष लक्ष असते. त्यांच्या विशेष प्रयत्नातून येथे उतावळी नदीवरील पूल २ कोटी रुपये, मनरेगा अंतर्गत रस्ते ५० लक्ष रुपये, मुस्लीम वस्तीत शादीखाना २५ लक्ष रुपये व सभामंडप ७ लक्ष रुपये, महादेव मंदिर सभामंडप १० लक्ष, नारायण पुरी संस्थान सभामंडप १० लक्ष, संरक्षण भिंत ७ लक्ष, मुस्लिम कब्रस्तान संरक्षण भिंत १० लक्ष, सामाजिक न्याय विभाग अंतर्गत सिमेंट रस्ता १५ लक्ष रुपये, जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ८ कोटी रुपये, पर्यटन विकास अंतर्गत ईसाई माता संस्थान येथे ४ कोटी ५० लक्ष रुपये , हायमस्ट लाईट सह ईतरही कामे मिळाली असून, यातील बहुतांश कामे पूर्ण देखील झाली आहेत. मनरेगाअंतर्गत आणखी ३० लाखाचे अंतर्गत रस्ते, डीपीडीसीतून उर्दू शाळा खोल्या तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात दर्जोन्नतीसह इतरही कामे प्रस्तावित असून, आ. रायमूलकरांनी अनेक गरजूंना वैयक्तिक मदतही केल्याचे सरपंच संदीप अल्हाट यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.


आ. डॉ. संजय रायमुलकर यांचा आज, ३ ऑगस्टरोजी वाढदिवस असून, यानिमित्ताने मतदारसंघात विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेले सरपंच संदीप अल्हाट यांच्या पुढाकाराने मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शाळेतील ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाईचे वाटप आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्याहस्ते तसेच सरपंच संदीप अल्हाट व मान्यवरांच्या उपस्थितीत ५ ऑगस्टरोजी सोमवारी दुपारी १ वाजता करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक तथा सरपंच संदीप अल्हाट व मित्र मंडळाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!