साखरखेर्डा (अशोक इंगळे) – आज गुणवत्ता यादीत मुलींचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. कारण मुलींच्या अभ्यासात सातत्य आहे. हे स्पर्धेचे युग आहे जो शिकेल तो टिकेल. यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे, असे प्रेरणादायी प्रतिपादन माजी शिक्षणमंत्री तथा आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारप्रसंगी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे हे होते. तर मठाचे मठाधीपती सिध्दलिंग शिवाचार्य महाराज, मठाधीपती सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, कै. भास्करराव शिंगणे कला, नारायण गावंडे विज्ञान, आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राम जाधव, सरपंच सुमनताई जगताप, उपसरपंच सय्यद रफीक, माजी सरपंच पूनम महेंद्र पाटील, माजी सरपंच कमलाकर गवई, माजी सरपंच दाऊद कुरेशी, माजी सभापती तेजराव देशमुख, भोजराज गाडेकर, संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य शुभम राजपूत, जिजामाता विद्यालयाचे सचिव पंजाबराव हाडे, आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त व्ही. टी. पंचाळ, रमेश दंदाले, ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ललित अग्रवाल, माजी उपसभापती सुनील जगताप, तोताराम ठोसरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल तुपकर, चिखली अर्बनचे संचालक विश्वनाथ अप्पा जितकर, आम्ही तेली जय संताजी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पोधाडे, मुख्याध्यापक रमेश ठोसरे, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे विशेष प्रतिनिधी पत्रकार अशोक इंगळे, दैनिक सकाळचे बातमीदार देविदास पंचाळ, पत्रकार सचिन खंडारे, माजी उपसरपंच अस्लम अंजूम, प्रल्हाद देशमुख, माजी उपसरपंच इब्राहिम शहा, डॉ. प्रशांत भालेराव, माजी प्राचार्य संतोष दसरे, पिंपळगाव सोनाराचे सरपंच नितीन ठोसरे, पंढरीनाथ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य शारदा दंदाले, केंद्रप्रमुख दिलीप खंडारे, मुख्यध्यापक कैलास ढोलेकर, गुलाबराव तुपकर आदी उपस्थित होते. गुणवत्ता कशी टिकून राहील, यासाठी टार्गेट ठरवून काम करा, आपले टार्गेट पुर्ण झाले पाहिजे. ते मग अभ्यासात असो की कामात असो. महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला महत्त्व दिले आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे. जे विद्यार्थी भाषण मनलाऊन ऐकता ते डॉक्टर, इंजिनिअर, वकील होतात. याही पुढे जाऊन आयपीएस अधिकारी होतात. आणि जे शाळेत, कार्यक्रमात गोंधळ घालतात ते एक तर आमदार, खासदार होतात किंवा वाईट मार्गाला लागतात. आपल्याला काय बनायचे आहे, याचा निर्णय बालवयात घेतल्या गेला पाहिजे. आपण जर योग्य निर्णय घेतला नाही तर संसाराची वाट लागते हेही तितकेच खरे आहे, असेही विचार यावेळी डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी मांडले.
यावेळी प्राचार्य डॉ. नीलेश गावंडे, सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, रमेश दंदाले यांनी आपले विचार मांडले. जिजामाता विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक रमेश दंदाले हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा व शारदा दंदाले यांचा सहपत्नीक सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी १० वी १२ वी, आयआयटी, वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा सत्कार माजीमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन विदर्भ न्याय व पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले होते. प्रास्ताविक संतोष गाडेकर यांनी तर कार्यक्रमाचे संचलन सुधाकर पर्हाड यांनी केले.
——–