BULDHANAChikhali

विधानसभेच्या लढ्यासाठी सज्ज व्हा; भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

बुलढाणा (संजय निकाळजे) – बहुजन समाजाला तसेच जनसामान्यांना खऱ्याअर्थाने आपले अधिकार व हक्क मिळवून देण्यासाठी सत्तेशिवाय पर्याय नाही. त्यासाठी विधानसभेत जावे लागेल, असे सांगत आपल्याला विधानसभा निवडणूक लढवायची आहे, असा निर्धार नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी गुरुवार, १८ जुलै रोजी आयोजित बैठकीत जाहीर केला. याप्रसंगी त्यांनी विधानसभेच्या लढ्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहनही उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.

भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांनी होतकरू, निडर, नि:स्वार्थी आणि जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी अहोरात्र झटणारे व्यक्तिमत्व सतीश पवार यांच्यावर बुलडाणा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे. नियुक्तीच्या पहिल्या दिवसापासूनच सतीश पवार जनहिताच्या कामाला भिडले. जनतेच्या समस्या मांडत शासन, प्रशासनाकडून त्या सोडवून घेण्याची धमक त्यांनी ठेवली आहे. जिल्हा परिषद शाळांची झालेली दुर्दशा दूर करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी त्यांनी जि.प.चे सीईओ कुलदीप जंगम यांची भेट घेतली. पंधरा दिवसांच्या अवधीत प्रश्न मार्गी लावावेत; अन्यथा जिल्हा परिषदेला घेराव घालू, असा इशारा दिला आहे. दरम्यान, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीसह विविध विषयांना हात घालून चर्चा करण्यात आली. बहुजन समाजाला सर्वतोपरी न्याय मिळवून देण्यासाठी, आपले न्याय हक्क मिळवून घेण्याकरिता, सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींसाठी नोकरी, रोजगार, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व सामान्यांना आपले अधिकार प्राप्त करवून देण्यासाठी भीम आर्मीने महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तेचा भागीदार होण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यासाठी विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी करण्याचे सतीश पवार यांनी यावेळी जाहीर केले.उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील आपली तयारी दर्शवित निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखवत सतीश पवार यांचे हात बळकट केले.
या बैठकीला कार्याध्यक्ष जितेंद्र खंडेराव, सुरेश जाधव, अर्जुन खरात, बाला राऊत, अनिल जवरे, सतीश गुरचवळे, सुनिल वाकोडे, अमोल इंगळे, संजय वानखेडे, अनिल पवार, राजू मोरे, कैलास खिल्लारे, विजय गजभिये, शेख गुलाम अशरफ, किरण पवार, समाधान पवार, मोहन सरकटे, संतोष कदम,कडूबा पैठणे, विजय पवार, सत्यपाल तायडे, रतन पवार, शांताराम दामोदर, राजू गवई, भीमराव गरुडे, विशाल साळवे, मिलिंद यमनेरे, अजय गोरे, अजय गायकवाड, बापूंना चोपडे, भावेश चोके, संतोष वाकोडे, नंदकिशोर इंगळे, रोशन शिखरे, सत्यपाल तायडे, संतोष हिवराळे, रॉबिन शिरसाट, गोपाल काकडेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
—-

समाजासाठी कार्य करण्याची शपथ

शिक्षण, आरोग्य, रोजगार, संरक्षणसह सर्वांना समान संधी मिळवून देण्यासाठी भीम आर्मी सदैव कार्यरत राहील. ‘ जिथे कमी तिथे भीम आर्मी ‘ या पद्धतीने सदैव समाजासाठी कार्य करू, अशी शपथ याप्रसंगी भीम आर्मीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!