BULDHANADEULGAONRAJAHead lines

देऊळगावराजा वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांच्या आशीर्वादानेच वनजमिनीवर अतिक्रमण!

– देऊळगावराजा वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांची चौकशी करून बडतर्फ करण्याची सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांची मागणी

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – देऊळगावराजा वनपरिक्षेत्रात भोसा बिट क्रमांक ५५९ मध्ये वनजमीन वहिती करणार्‍यांना प्रोत्साहन देऊन वनक्षेत्रात विहिरीचे खोदकाम करणार्‍याविरुद्ध कारवाई न करता, आर्थिक संबंध जोपासणार्‍या वनपरिक्षेत्र अधिकार्‍याविरुद्ध सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी देऊळगावराजा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ज्ञानदेव खरात यांनी वन विभागाच्या प्रधान सचिवांसह प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर, मुख्य वनसंरक्षक अमरावती, उपवनसंरक्षक बुलढाणा यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
तक्रारअर्ज
तक्रारअर्ज
वनजमिनीवर खोदलेली विहीर.

खरात यांनी या तक्रारअर्जात नमूद केले आहे, की वनवृत अमरावतीमधील बुलढाणा वन विभागातील वनपरिक्षेत्र देऊळगावराजा वर्तुळ सिंदखेडराजा बीट – भोसा कक्ष क्रमांक ५५९ मध्ये काही इसमांनी वनक्षेत्राची साफसफाई करून शेतीयोग्य जमीन केली असून, मागील चार आठवड्यापासून वनजमिनीवर जेसीबी पोकलॅड मशीनद्वारे साफसफाई केली गेली आहे. ही शेतजमीन तयार करून त्यामध्ये या पावसाळ्यात त्यांच्याकडून या वनजमिनीवर शेती घेण्याचा माणस आहे. परंतु, वनजमीन साफसफाई करून शेतीसाठी उपयोगात आणतांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून, अतिक्रमणधारक शेतकरी यांच्याकडून आर्थिक रक्कम घेऊन २० एकर वनजमीन वहिती करण्यास प्रोत्साहन दिले, असा आरोपदेखील करण्यात आला आहे. तसेच, मागील महिन्यात याच अतिक्रमित शेतीक्षेत्रात पोकलॅड मशीनद्वारे विहिरीचे खोदकाम होत असतांना वनपरिक्षेत्र अधिकारी अधिकारी देऊळगावराजा यांनी पोकलॅड मशीन थांबवून चालकास वनक्षेत्रातील पोकलॅड मशीनद्वारे होत असलेल्या विहीर खोदकामाबाबत दमदाटी करून करुन त्याच्यावर जप्तीची कारवाई न करता, पोकलॅड मालक यांच्याकडून जागेवर लाखो रुपयांची आर्थिक तडजोड करुन पोकलॅड मशीन सोडून दिली, असा गंभीर आरोपदेखील खरात यांनी केला आहे. त्याबाबत फक्त शेतकर्‍यावर थातूरमातूर वनगुन्हा नोंद करुन शेतकर्‍यांना बळीचा बकरा बनवत आहेत. तसेच अतिक्रमणधारकांना सांगितले, की आम्ही वनाधिकारी आहे, तुम्ही बिनधास्त शेती करा. वनगुन्हा तात्पुरता असून, आम्ही तुम्हाला अटक करणार नाही. त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे अतिक्रमणधारकांना पाठबळ असून, पोकलॅड मशीनवर कारवाई न करता सोडून देणारे वनपरिक्षेत्र अधिकारी देऊळगावराजा (प्रा) यांच्यावर बडतर्फीची कारवाई होऊन त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीदेखील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!