DEULGAONRAJAHead linesSINDKHEDRAJA

पीकविमाप्रश्नी कृषी व महसूल अधिकार्‍यांनी उचलली पीकविमा कंपनीचीच तळी; शेतकर्‍यांचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा!

देऊळगावराजा (राजेंद्र डोईफोडे) – शेतकर्‍यांचा पीकविमा देण्यास टाळाटाळ करणार्‍या पीकविमा कंपनीचीच बाजू महसूल व कृषी प्रशासनाने उचलून शेतकरी वार्‍यावर सोडल्याने सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ३० जूनपर्यंत पीकविमा न मिळाल्यास जलसमाधी आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी दिला आहे.

सविस्तर असे, की मातृतीर्थ सिंदखेडराजा व देऊळगावराजा येथील प्रलंबित पीकविमा मिळविण्यासाठी शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बालाजी सोसे व गजानन जायभाये यांनी मागील आठवड्यात जाहीर केलेले आत्मदहन आंदोलन थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने २६ जूनची ठेवलेली बैठक फार्स ठरली, आणि प्रशासनाने पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या फिडिंगपुढे हतबल होत शेतकर्‍यांची अक्षरशः चॉकलेटवर बोळवण करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकर्‍यांनी उपस्थित केलेल्या विविध संयुक्तिक प्रश्नावलीमुळे प्रशासन हतबल झालेले दिसून आले, आणि शेवटी जेव्हा वरतून येईल तेव्हाच पीकविमा मिळेल, असा सावध पवित्रा घेतला. याचा निषेध म्हणून शेतकर्‍यांनी दिनांक ३० जूनपर्यंत पीकविमा प्रश्नावर निर्णय न झाल्यास सामूहिक जलसमाधी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. यावेळी शेतकर्‍यांनी आपला सर्व रोष कृषी विभाग व पीकविमा कंपनीच्या प्रतिनिधीनवर व्यक्त करत, निषेध व्यक्त केला.

या प्रसंगी शेतकरीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेतकर्‍यांची बाजू अत्यंत अभ्यासू आक्रमकपणे मांडण्यासाठी बालाजी सोसे व गजानन जायभाये यांच्या सोबतीला बळीवंश लोकचळवळीचे नितीन कायंदे, भगवान पालवे, कैलास मेहेत्रे, किशोर कायंदे, राजेश फुलझाडे व असंख्य शेतकरी उपस्थित होते. शासनाच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, नायब तहसीलदार अस्मा मुजावर, कृषी अधिकारी पांचाळ व पीकविमा कंपनीचे श्री मांटे यासमवेत विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!