– शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी शेणफडराव घुबे पाटलांचे राज्य सरकारला साकडे!
देऊळगाव घुबे (प्रतिनिधी) – राज्य सरकारचे प्रशासकीय अधिकारी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले पाटील यांनी सोमवारी येथील जानकीदेवी शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बुलढाणा कारागृह अधीक्षक संदीप पाटील भुतेकर, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया ग्रूप’चे मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेणफडराव घुबे पाटील यांनी विद्याधर महाले यांच्यासह उपस्थितांचे यथोचित स्वागत केले.
आपल्या सदिच्छा भेटीत विद्याधर महाले पाटील यांनी जानकीदेवी शिक्षण संस्थेच्या वाटचालीची माहिती घेतली. तसेच, संस्थेची प्रगती जाणून घेतली. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शेणफडराव घुबे यांनी रखडलेल्या शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित करत, ही कर्जमाफी मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली. त्यावर हा मुद्दा शासन दरबारी पोहोचवू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीनंतर देऊळगाव घुबे येथे चक्रीवादळात उडून जाऊन मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीच्या साखरे कुटुंबीयांचीही विद्याधर महाले पाटील यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच, तातडीने प्रशासकीय मत देण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्यात. या दुर्देवी घटनेत जखमी झालेल्या गजानन घुबे यांचीही भेट घेऊन त्यांची आस्थेवाईक चौकशी करत सर्वतोपरी सहकार्याचे निर्देश अधिकार्यांना दिलेत. याप्रसंगी गणेश घुबे, अशोक घुबे, दीपक घुबे, स्वप्नील मुजमले, गोपाल डुकरे, राजेंद्र साखरे, पत्रकार ऋषीकेश भोपळे, समाधान घुबे, शिक्षक नीलेश मिसाळ यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
—–
वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिक्षक संघटनेचे साकडे!
शाळेत नोकरी करत असताना १०-१५ वर्षे सरली तरीपण फुल पगार मिळालेला नाही. त्यामुळे अनेक कौटुंबीक आव्हाने निर्माण झालेली आहेत. त्यामुळे ६० टक्के अनुदानावर आलेल्या शाळांतील शिक्षकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, तसेच पुढील टप्पावाढीबाबत सरकारने निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन राज्य सरकारला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी व राज्य सरकारचे सहसचिव विद्याधर महाले पाटील यांच्यामार्फत देण्यात आले. यावेळी शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गजानन मिसाळ यांनी सविस्तर चर्चादेखील केली. याप्रसंगी जानकीदेवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे, सचिव प्राध्यापक उद्धव घुबे, संस्थेचे प्राचार्य हरिभाऊ घुबे तसेच संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक गजानन मिसाळ, तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक संतोष मिसाळ, प्रसिद्धी प्रमुख मोहन पाटील, प्राध्यापक अमोल डुकरे, प्राध्यापक दिलीप थुट्टे, प्राध्यापक प्राध्यापक रामेश्वर कर्हाडे, प्राध्यापिका सुनंदा शेळके, प्राध्यापिका रिता भीताडे आदींची उपस्थिती होती.
—————
अधिकारी म्हणून काम करताना लोकांप्रती जबाबदारीचे भान ठेवले तर कारकीर्द यशस्वी होते!