BULDHANAHead linesSINDKHEDRAJAVidharbha

अ‍ॅड. शर्वरीताई तुपकरांनी केले देऊळगाव घुबेतील साखरे कुटुंबाचे सांत्वन

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – चक्रीवादळाने सिंदखेडराजा व चिखली तालुक्यात अक्षरश: थैमान घातले आहे. यात अनेकांच्या घरांची पडझड झाली, टिनपत्रे उडाले, अनेकांनी पेरणीसाठी आणून ठेवलेली खते, बियाणे ओली झाली आहेत. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी अ‍ॅड. शर्वरीताई रविकांत तुपकर यांनी १२ जूनरोजी सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात पाहणी केली व नुकसानग्रस्तांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. देऊळगावघुबे येथे चक्रीवादळाने झोक्यात झोपलेली चिमुकली टिनपत्रांसह उडवून नेली होती. तिचा जमिनीवर आदळून मृत्यू झाला होता. त्या साखरे कुटुंबीयांची अ‍ॅड. तुपकरांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

सिंदखेडराजा व चिखली तालुक्यातील काही गावांमध्य चक्रीवादळाने मोठी हानी केली आहे. अनेकांच्या घरावरील छत उडाले, काहींची घरे पडली, काही ठिकाणी घरांवर झाड, विद्युत खांब कोसळून नुकसान झाले तर अनेकांच्या घरात ठेवलेली खते व बियाणे पावसात भिजून नुकसान झाले आहे. अ‍ॅड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी १२ जूनरोजी सिंदखेडराजा आणि चिखली तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन नुकसानीची पाहणी करत शेतकर्‍यांना धीर दिला. जागदरी, बाळसमुद्र येथेही प्रचंड नुकसान झाले आहे. येथेही अ‍ॅड. शर्वरी तुपकर यांनी भेट देवून नुकसानग्रस्तांकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेतली व पाहणी करत गावकर्‍यांना धीर दिला. यावेळी त्यांच्यासोबत विनायक सरनाईक, विलास मुजुमले, समाधान घुबे, प्रमोद घुबे, परमेश्वर घुबे, ऋषी भोपळे, प्रकाश घुबे उपस्थित होते. तर या नैसर्गिक संकटामुळे ज्यांची घरे पडली, छत उडाले त्यांच्यासाठी तात्पुरती निवार्‍याची सोय करावी, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

साखरे कुटुंबाचे केले सांत्वन

चक्रीवादळाचा मोठा तडाखा चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे या गावालाही बसला आहे. येथील अनेकांची घरे पडली, छते उडाली असून, अनेकांचा संसार उघड्यावर आला आहे. भारत साखरे यांची सहा महिन्यांची चिमुकली झोक्यात झोपली होती. या वादळात टिनपत्रांसह चिमुकली सईदेखील झोक्यासोबत उडून गेली. या दुर्दैवी घटनेत या चिुकलीचा मृत्यू झाला. अ‍ॅड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी साखरे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत धीर दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!