BULDHANAHead linesVidharbha

वीज पुरवठा सुरूळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न; बहुतांश गावे अंधारातून उजेडात!

– उद्यापर्यंत बहुतांश वीज पुरवठा सुरूळीत करण्यास येणार यश!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात काल संध्याकाळच्या दरम्यान मलकापूर, खामगाव, शेगाव, नांदुरा आणि संग्रामपूर भागात झालेल्या चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेली वीज यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी, लाईनमन हे दीडशे कंत्राटी कर्मचार्‍यांसह गेल्या ३६ तासांपासून युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, त्यामुळे बहुतांश गावे अंधारातून उजेडात आली आहेत. तर अद्यापही बहुतांश गावांतील वीजपुरवठा सुरूळीत झालेला नाही. या गावांचाही वीज पुरवठा पुढील काही तासांत सुरूळीत करण्यासाठी जोरदार कामे सुरू असल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.
वादळाने शेतात असे वीजखांब उन्मळून पडले होते. तर महावितरणचे अभियंता व वरिष्ठ अधिकारी स्वतः फिल्डवर पोहोचले होते.

जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळाचा वेग एवढा प्रचंड होता की, उच्चदाब व लघुदाबाचे शकडो वीज खांब जमीनदोस्त झाल्यामुळे मलकापूर आणि खामगाव विभागील २३ उपकेंद्रे ही अंधारात गेली होती. यामध्ये ३३ केव्ही सालीपुरा, ३३ केव्ही जांभूळधावा, ३३ केव्ही हरसोळा, ३३ के.व्ही. एपीडीआरपी, ३३ केव्ही दाताळा, ३३ केव्ही बेलाड, ३३ केव्ही दसरखेड, ३३ केव्ही नांदुरा, ३३ केव्ही फुली, ३३ केव्ही महाळुंगे, ३३ केव्ही सुजातपूर, ३३ केव्ही नायगाव, ३३ केव्ही चांदूर, ३३ केव्ही मोताळा, ३३ केव्ही पोफळी, ३३ केव्ही किनोळा, ३३ केव्ही वाघजळ, ३३ केव्ही सावरगाव, ३३ केव्ही वडजी, ३३ केव्ही पिंपळगाव काळे, ३३ केव्ही आसलगाव, ३३ केव्ही नारखेड आणि ३३ केव्ही निमगाव उपकेंद्राचा समावेश आहे. कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे आणि मुळे यांच्या मार्गदर्शनात रात्रीतून सुरू केलेल्या कामामुळे ३३ केव्ही सालीपुरा, ३३ केव्ही जांभूळधावा, ३३ केव्ही दाताळा, ३३ केव्ही नांदुरा, ३३ फुली, ३३ केव्ही महाळुंगे, ३३ केव्ही सुजातपूर, ३३ केव्ही नायगाव, ३३ केव्ही चांदूर, ३३ केव्ही पोफळी आणि ३३ केव्ही किनोळा उपकेंद्राचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे.
बुलडाणा विभागात ३३ केव्ही किनगाव आणि ३३ केव्ही साखरखेर्डा उपकेंद्राचा बंद पडलेला वीज पुरवठा रात्रीतून पूर्ववत करण्यात आला आहे. परंतु, किरकोळ दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, जिल्हयात खामगाव विभागातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर परिसरात वादळाचा फटका बसल्याने शेकडो वीज खांब जमीनदोस्त झाले आहे. महावितरणच्या अविरत प्रयत्नाने शेगावचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. खामगावाचाही बराच भाग पूर्ववत झाला आहे. उर्वरित वीज पुरवठा सुरूळीत करण्यासाठी कर्मचारी व कंत्राटदार एजन्सीचे कर्मचारी कार्यरत आहे.


बॅटरीच्या उजेडात दुरूस्ती कार्य!

वादळ थांबताच दुरूस्ती कार्याला सुरूवात करण्यात आली. रात्रभर कर्मचार्‍यांनी चक्क बॅटरीच्या प्रकाशात फॉल्ट शोधले आणि वीज खांबावर चढून दुरूस्तीचे काम करण्यात आले.


मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता ‘फिल्ड’वर!

वादळामुळे विस्कळीत यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदार एजंन्सीचे कर्मचारी मागील चोविस तासांपासून युध्दस्तरावर काम करत आहे. मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर व अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेत कार्यरत कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासाठी फिल्ड गाठले होते. महावितरणची संपूर्ण यंत्रणा युध्दस्तराव कार्यरत आहे. वादळामुळे झालेले नुकसान प्रचंड आहे. शक्य त्या ठिकाणी महावितरणकडून बॅकफिडींगने वीज पपरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक वीजवाहिनीचे पोल टू पोल पेट्रोलिंग करून, फॉल्ट शोधण्याचे काम युध्दस्तरावर सुरू आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुरेंद्र कटके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!