चिखली (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील किन्ही सवडद येथील कु. समीक्षा सहदेव धुरंदर हिने नुकत्याच लागलेल्या इयत्ता दहावी सीबीएसईच्या परीक्षेत जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथून मुलींतून पहिला क्रमांक पटकावला आहे. याच शाळेतून ती दुसरीदेखील आली आहे. आयएएस (सनदी अधिकारी) होण्याचे समीक्षाचे स्वप्न आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे प्रतिनिधी महेंद्र हिवाळे यांची समीक्षा ही भाची आहे.
केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई)चा इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत समीक्षा धुरंदर हिने ९४.६० टक्के मार्क्स घेऊन जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव येथून मुलींतून पहिला क्रमांक पटकावला. विज्ञात आणि गणित या विषयांत तिने सर्वोत्तम गुण प्राप्त केलेले आहे. ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील असलेली समीक्षा ही अतिशय हुशार व चुणचुणीत अशी मुलगी आहे. जीद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर तिने हे यश ंसपादन केले असून, तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात यूपीएससी उत्तीर्ण करून आयएएस अधिकारी होण्याचे समीक्षाचे स्वप्न आहे. जेएनव्ही, शेगावचे प्राचार्य आर .आर .कसर, उपप्राचार्य देशमुख, वर्ग शिक्षक महेश चौधरीसह शिक्षकवृंद व कर्मचाऱ्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ मीडिया ग्रूपचे अध्यक्ष तथा मुख्य संपादक पुरूषोत्तम सांगळे, सहाय्यक संपादक बाळू वानखेडे, विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, ‘देशोन्नती’चे ज्येष्ठ पत्रकार तथा चिखली तालुका विकास संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रतापराव मोरे आदींनी समीक्षाचे अभिनंदन केले असून, तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.