SINDKHEDRAJAVidharbha

वाळूतस्करांना महसूल अधिका-यांचे दणके सुरूच; ढोरवी, ताडशिवणी येथे रेतीचे टिप्पर पकडले!

सिंदखेडराजा (अनिल दराडे) – कर्तव्यदक्ष तथा प्रमाणिक उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या आदेशानुसार, तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी वाळूचोरांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली असून, ढोरवी व ताडशिवणी येथे महसूलच्या भरारी पथकाने दोन टिप्पर पकडून रेतीचोरट्यांना जोरदार दणका दिला आहे. या भागातील रेतीचोरीबाबत ब्रेकिंग महाराष्ट्रने जोरदार आवाज उठविला होता. त्यानंतर महसूल प्रशासनाने धडाकेबाज कारवाया सुरू केल्याने वाळूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

आज, दिनांक 14 मे रोजी सिंदखेडराजा तालुक्यात अवैध रेती वाहतूक व उत्खननास प्रतिबंध करण्यासाठी उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा व तहसीलदार सिंदखेडराजा यांचे मार्गदर्शनाखाली अवैध गौणखनिज प्रतिबंध पथक गस्त करीत असता मलकापूर पांग्रा – ढोरवी रस्त्यावर टिपर वाहन क्रमांक MH 28 BB 7577 मध्ये 3 ब्रास अवैध रेती वाहतूक आढळून आली. वाहन मालक रविंद्र बापुराव मुरकुट रा.ढोरव्ही ता.सिंदखेडराजा यांचेकडे रेती वाहतूक परवाना आढळून आला नाही. त्यामुळे सदर वाहन पोलीस स्टेशन साखरखेर्डा येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये तलाठी जी.वाय.दराडे, आर.बी.काकडे, एस एस चव्हाण, ए.ओ. गव्हाणकर, कोतवाल आकाश माघाडे, रामेश्वर यांनी सहभाग घेतला हाेता.
तसेच, काल दिनांक 13 मेरोजी रात्री अवैध गौणखनिज प्रतिबंध पथक गस्त करीत असतांना ताडशिवणी येथील टिपर क्रमांक MH 28 BB 6112 मध्ये अवैध रेती घेवून जात असल्याची खबर सदर पथकाला लागली असता, राहेरी – ताडशिवणी रोडवर रात्री अकरा वाजता टिपरला पथकाने थांबवून पाहीले. त्यामध्ये दीड ब्रास रेती आढळून आली. वाहन चालक यांच्याकडे रेती वाहतुक परवाना आढळून आला नाही. सदर वाहनाचे मालक सतीश रामभाऊ देशमुख, रा .ताडशिवणी हे आहेत. सदर वाहन तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाई तलाठी रवी लांडगे, जी.वाय.दराडे, आर.बी.काकडे, एस एस चव्हाण, राहुल देशमुख, विष्णु थोरात या पथकाने केली . सदर प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 मधील कलम 48 (7)(8), महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय गौखनि-10/029/प्र.क्र.9 ख-1 दिनांक 3/9/2019, शासन, महसूल व वन विभाग अध्यादेश क्रमांक गौखनि -10/0215/प्र.क्र.92/ख, दिनांक 12 जानेवारी,2018 मधील (6) नुसार तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनाक 12 जून2015. जिल्हाधिकारी, बुलडाणा यांचे पत्र दिनांक 04/जुलै,2015, दिनांक 03 फेब्रुवारी 2018 व दिनांक 7 डिसेंबर, 2015 नुसार संबंधीत गैरअर्जविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पथकाने दिली आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!