– दुसरबीड येथील धाडीत जप्त केला होता २० ब्रास अवैध रेतीसाठा!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील दुसरबीड येथे धाड टाकून जप्त करण्यात आलेला तब्बल २० ब्रास अवैध रेतीसाठी महसूल विभागाने ताब्यात घेतला होता. कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली होती. हा रेतीसाठी आजअखेर घरकुल लाभार्थ्यांमध्ये वितरीत करण्यात आला आहे. वाळूअभावी बांधकाम रखडलेले घरकुल लाभार्थी प्रा. खडसे यांच्या पुढाकाराने सुखावले असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
काल दि.१० मे, शुक्रवारी एसडीओ प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार प्रवीण धानोरकर, बीडीओ श्रीकृष्ण वेणीकर, तलाठी राहुल देशमुख, पोलीस शिपाई सलीम परसुवाले, अस्लम नवरागबादी यांनी दुसरबीड परिसरात धाडी टाकून तेथे आढळलेल्या २० ब्रास रेतीसाठ्याचा पंचनामा करुन जप्त केला होता. त्यानंतर ह्या साठ्याचे करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावेळी दुसरबीड येथे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेती मिळत नसल्याचे आढळून आले. त्यांना रेती वाटप करण्यासाठी एसडीओ डॉ. खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल लाभार्थी असलेल्या गबाजी त्र्यंबकराव पवार, गजानन बाबुराव जगताप, संजय साहेबराव मोतेकर, शंकर अजबराव ढवळे, बाबुराव नामदेव जगदाळे, विठ्ठल आसाराम इंगळे, उत्तम रोडूबा शिंदे, बाबासाहेब भगवान भोसले, लीलाबाई तुकाराम जाधव, निर्मलाबाई किसन तिपाले या दहा व्यक्तींना प्रत्येकी २ ब्रास रेतीसाठा वाटप करण्यात आला. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. एसडीओंनी अशाच समाजोपयोगी कल्पनांचा अवलंब करावा, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.
वाळूतस्कराला दणका; शेंदूर्जन येथे वाळूतस्करी करणारे टिप्पर पकडले!