अक्षय तृतीय्येच्या मुहुर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीस ११ हजार आंब्यांची आरास, महानैवेद्य
पुणे / आळंदी (अर्जुन मेदनकर) – पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दि १० रोजी साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य शुक्रवारी दाखविण्यात आला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्ण, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथील मुले तसेच गणेशभक्तांना देण्यात येणार आहे. तसेच, श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात प्रथा परंपरांचे पालन करीत चैत्र महिन्यात श्रीनां चंदनउटी लावण्यात येते. माऊलींचे संजीवन समाधीवर चंदन उटीतून श्रींचे श्री रामलल्ला वैभवी रूप साकारण्यात आले. श्रींचे वैभवी रूप दर्शनासह चैत्र गौरी पूजनास भाविकांनी माऊली मंदिरात तसेच ठिक ठिकाणचे मंदिरांत दर्शनास गर्दी केली. श्रींचे उटीसह गाभा-यात मोगरा फुलांची लक्षवेधी सजावट, आंब्यांची आरास, समीप श्रीराम मंदिर प्रतिकृती पाहण्यासह भाविकांनी गर्दी केली. स्वकामसेवा मंडळाचे वतीने भाविकांना पन्ह आणि डाळ प्रसाद वाटप करण्यात आले.
पुणेत दगडूशेठ हलवाई गणराया भोवती केलेली आंब्यांची आकर्षक आरास, मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती, प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात भाविकांनी गणरायाचे दर्शन घेतले. या सजावटीचे आणि गणरायाचे छायाचित्र गणेशभक्तांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले. देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला. मंदिरात पहाटे प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि सहकाऱ्यांनी गायन सेवा अर्पण केली. सूक्त पठण आणि अभिषेक करण्यात आला. आंब्याची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
श्री रामलल्ला चंदन उटी दर्शनास माऊली भक्तांची गर्दी
अक्षय तृतीये निमित्त आळंदी देवस्थान आणि स्वकाम सेवा मंडळाचेवतीने अध्यक्ष सुनील तापकीर आणि सर्व स्वकाम सेवक साधकांनी उटीचे लक्षवेधी नियोजन करीत चंदन उटी सेवा रुजू केली. मंदिरात चैत्र गौरी पूजन, चंदन उटी दर्शन उत्साहात झाले. महिला भाविकांनी कारंजा मंडपात गर्दी करून श्रींचे दर्शन घेत हळदी-कुंकू घेतले. आळंदी मंदिरातील कारंजा मंडपात चैत्र गौरी पूजना निमित आकर्षक सजावट करण्यात आली होती. चैत्र गौरीचे वैभवी रूप पाहण्यासह दर्शनास महिला, भाविक, नागरिकांनी गर्दी केली. श्रीचे गाभाऱ्यात अक्षय तृतीये निमित्त संजीवन समाधीवर चंदन उटीतुन माऊलींचे श्री रामलल्ला रूप परिश्रम पूर्वक अभिजित धोंडफळे, मोरेश्वर जोशी, योगेश चौधरी, महेश जोशी यांनी साकारले. विविध वस्त्रालंकारांनी सजलेले श्रींचे रूप दर्शनास भाविकांनी गर्दी केली. आळंदी परिसरात साडेतीन मुहूर्ता पैकी एक असणारा अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत विविध नवीन उपक्रम आणि वाहन खरेदी निमित्त वाहनाची मंदिरा बाहेर पूजा मोठ्या उत्साहात करण्यात आली.
माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत अक्षय तृतीये निमित्त प्रथम घंटानाद, काकडा, श्रींना पवमान अभिषेक, दुधारती, पूजा आणि भाविकांचे दर्शन तसेच महिलांचा हळदी-कुंकू असे कार्यक्रम उत्साहात झाले. अक्षय तृतीया दिनी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांनी श्रींचे दर्शन घेत मंदिरास भेट दिली. या प्रसंगी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, संजय रणदिवे, श्रीकांत लवांडे, ज्ञानेश्वर पोंदे, सोमनाथ लवंगे आणि सेवक यांनी देवस्थानच्या प्रथा प्रमाणे धार्मिक महत्व ओळखून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था ठेवली. संस्थांनचे संजय लवांडे, सोमनाथ लवंगे, महेश गोखले आदींनी मंदिरातील तसेच भाविकांचे दर्शनाचे नियोजन केले. येथील नव्याने भव्य दिव्य विकसित करण्यात आलेल्या श्री लक्षशांती गणेश मंदिरात श्रींचे मंदिर गाभाऱ्यातलक्षवेधी आंब्यांची सजावट करण्यात आली. अक्षय तृतीये निमित्त परिसरातील नागरी , भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली. यासाठी श्रींचे मंदिर निर्माते शांता येळवंडे, लक्ष्मण येळवंडे, सचिन येळवंडे, संतोष येळवंडे, सागर येळवंडे आणि येळवंडे परिवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी भाविकांनी श्रींचे दर्शनास तसेच पूजा, आरास पाहण्यास गर्दी केली. भाविकांना मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी श्री व सौ शांता लक्ष्मण येळवंडे परिवाराने भाविकांचे स्वागत केले. येथील श्री संत गोरोबाकाका समाधी मंदिरात अक्षय तृतीया निमित्ताने भगवान परमात्मा श्री विठ्ठल अवतार चंदन उटी परिश्रम पूर्वक साकारण्यात आली. यासाठी संत गोरोबा काका यांचे वंशपरंपरागत पुजारी किशोर दाते, किरण दाते आणि त्यांचे सहकारी बल्लाळेश्वर वाघमारे यांनी परिश्रम घेतले.