AalandiHead linesPachhim MaharashtraPune

मरकळ लोखंडे यांच्या गादी कारखान्याला भीषण आग; लाखोंची हानी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मरकळ मधील मरकळ आळंदी रस्त्यावरील पाण्याचे टाकी जवळील व्यावसायिक जयसिंग रामभाऊ लोखंडे यांच्या लोखंडे गादी कारखान्यास शुक्रवारी ( दि. ३ ) आग सायंकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत दोन ट्रक सह एक पिकअप आणि पत्राशेड कारखान्याचे आतील साहित्य आणि माल आगीत जळाल्याने प्रचंड वित्त हानी नुकसान झाली. मात्र सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही.

मरकळ कारखान्यातील आग आटोक्यात आणण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात आले. या आगीची घटना समजताच आळंदी पोलिस अधिकारी, कर्मचारी, आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी आज विजविण्याचे काम सुरू केले आहे. आग विजविण्यास मरकळ येथील घटनास्थळी आळंदी नगरपरिषद, पिंपरी चिंचवड महानगर पालिका व पुणे पीएमआरडी च्या अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले. घटनास्थळी परिसरात आग आटोक्यात आणण्यास सुमारे अडीच तास शर्तीचे प्रयत्न करण्यात आले. दरम्यान आतील गॅस सिलेंडर तात्काळ सुरक्षित बाहेर काढल्याने अधिकचा अनर्थ टळला. या लागलेल्या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परिसरातील नागरिकांनी आग वीजविण्यास गर्दी करून मदत केली. या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसल्याचे समजते. मात्र गादीचा कारखाना या आगीत जळून खाक झाला. यात पत्रा शेडसह आतील माल व कारखान्याचे लगतच्या गाड्यासह मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!