– इंदुरीकरांच्या कीर्तनाला उसळला जनसागर; गायत्रीताई शिंगणेंनी फुंकली तुतारी!
साखरखेर्डा (प्रतिनिधी) – पैशाने सुख मिळते, तेही खरेच मिळेल की नाही ते सांगता येत नाही. परंतु, आध्यात्मिक ज्ञानाने समाधान मिळते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा प्रबोधक हभप. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांनी केले. १ मेरोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिवस या दिवसाचे औचित्य साधून स्व .भास्कररावजी शिंगणे प्रतिष्ठान बुलढाणा यांच्यावतीने सिंदखेडराजा मतदारसंघातील शेंदुरजन येथे हभप. इंदुरीकर यांच्या भव्य हरिकीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रबोधन करताना ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा गायत्रीताई मुन्नासेठ शिंगणे ह्या होत्या, तर व्यासपीठावर सिंदखेडराजा मतदारसंघाचे युवा नेते गौरव शिंगणे तसेच स्व. मुन्ना शिंगणे यांच्या पत्नी गौरीताई शिंगणे ह्या उपस्थित होत्या. सुरुवातीला हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज यांचा सत्कार राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षा गायत्रीताई शिंगणे, गौरीताई शिंगणे, गौरव शिंगणे यांनी विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट देऊन केला.
निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये विविध विषयाला हात घालत आपल्या कीर्तनाला सुरुवात केली. त्यांनी सांगितले की, तरुण पिढी चांगल्या कामासाठी पुढे येताना दिसत असून ही आनंदाची गोष्ट आहे.गायत्रीताई शिंगणेसारखी तरुण महिला समोर येत आहे . चांगले काम करत आहे . समाजातील ८० टक्के लोक मोबाई मुळे भ्रमिष्ठ झाले आहे. मोबाईल मुळे लहान मुले तसेच तरुणपिढी बरबाद होत आहे , पैशाने मिळते ते सुख असून आध्यात्मिक ज्ञानाने मिळते ते समाधान आहे. यावेळी महाराजांनी संत तुकाराम , संत एकनाथ , संत निवृत्ती महाराज , संत ज्ञानदेव , संत मुक्ताबाई , संत सोपानकाका यांच्या अभंगाचा दाखला देत समाज प्रबोधन केले. तसेच विविध प्रकारचे उदाहरण सांगून हास्याचा कल्लोळ उडवला. यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन ऐकण्यासाठी शेंदुर्जन परिसरातून हजारो लोकांनी व महिलांनी गर्दी केली होती व याच गर्दीच्या माध्यमातून खर्याअर्थाने गायत्रीताई शिंगणे यांनी तुतारी फुंकल्याचे बोलले जात आहे. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशालभाऊ बंगाळे, विकास शिंगणे, मंगेश शिंगणे, विशाल वायाळ, शुभम शिंगणे, अविनाश कापसे, मोहसीन भाई यांच्यासह स्वर्गीय भास्कररावजी शिंगणे प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी अथक परिश्रम घेतले.
—————–