BuldanaHead linesJalgaon JamodVidharbha

जळगाव जामोद शहरातील समस्या सोडविण्यासाठी; युवा आंदोलक अक्षय पाटीलसह कार्यकर्त्यांचे न.प.समोर लक्षवेधी आंदोलन!

ज.जामोद(ब्रेकींग महाराष्ट्र) मागील अनेक दिवसांपासून जळगाव जामोद शहरामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्याबाबत न.प.प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वात आज 19 जुलै रोजी नगर परिषद कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करुन ढेपाळलेल्या न.प.प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

जळगाव जामोद शहरांमध्ये रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. मोकाट जनावरांमुळे मागीलवर्षी या दोनतीन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज बागेच्या बाजूला घाणीचे साम्राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी स्वच्छता करुन जागा उपलब्ध करून देण्यात यावी, शाळा क्रमांक २ मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व साफसफाई कर्मचारी उपलब्ध करुन देण्यात याव्यात, या मागण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे नागरिकांनी अनेकवेळा लेखी निवेदन देवून सुध्दा दखल घ्ज्ञेण्यात आली नसल्याने आज मंगळवार 19 जुलै रोजी लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाची न.प.मुख्याधिकारी यांनी दखल घेवून समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनामध्ये युवा आंदोलक अक्षय पाटील , अश्फाक देशमुख, अजय गिरी , तुकाराम पाटील, जनार्दन मोरखडे, गणेश सिंग परिहार, सोपान पाटील, गजानन व्यवहारे, राजु नितवने,अजय नितवने, श्रीराम व्यवहारे, संतोष इंगळे, पुरुषोत्तम गायकी, देवेंद्र सोमवंशी,शेख अस्लम,शेख करीम, इम्रान काझी, सोनु पाटील यांच्या अनेकजण सहभागी झाले होते.

शहरातील समस्या सोडविण्यात नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास भविष्यात नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलक अक्षय पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिला असल्याचे ‘ब्रेकींग महाराष्ट्रशी’ बोलतांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!