Head linesPolitical NewsPoliticsVidharbhaWARDHA

मतदारांना गृहीत धरण्याची गृहितके कोणत्या उमेदवाराच्या येणार अंगलट?

वर्धा (प्रकाश कथले) – सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे जोरात घुमू लागले आहे. रस्त्याने जाणारे भोंगे `विजयी करा`चे हाकारे देत आहे. विद्यमान केंद्र सरकारबाबत मतदारांतील नाराजीची सुप्त लाट पाहता महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे काँग्रेसचे उमेदवार अमर काळे यांना विजयाचा आत्मविश्वास आहे. त्याचवेळी भाजपचे उमेदवार रामदास तडस यांनाही आपणच मोदींच्या करिष्म्यावर तिसर्‍यांचा विजयी होणार, याचा आत्मविश्वास आहे. त्यातून मतदारांना गृहित धरण्याची गृहितके बा़ळसे धरून वावरत आहे. ही मतदारांना गृहित धरण्याची गृहितके कोणत्या उमेदवाराच्या अंगलट येणार, हेही मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. पण दोन्ही उमेदवारांत असलेला हा अतिआत्मविश्वास हा फारसा बरा नाही, हेही स्पष्ट करणे गरजेचे वाटत आहे.

लोखंडी रॉडने मारहाण,मला बेघर केलं ! | Prajapatra Liveखासदार रामदास तडस यांना पंतप्रधान मोदींच्या करिष्म्यावर विश्वास आहे. महागाई वाढली, पेट्रोल डिझेल, गॅसच्या भाववाढीतील, वाढत्या बेरोजगारीवरीच्या नाराजीवर मोदींचा करिष्मा मात करणारच,असे ठाम पणे वाटते. भाजपचे उमेदवार रामदास तडस हे त्यांच्या स्वकर्तृत्त्वाच्या भरवशावर मते मागताना दिसत नाही. ते मोदींच्या नावावर मते मागतात. त्यातच भाजपला देवळी शहरातील भांडणात गोटे उचलण्याच्या व्हा़यरल व्हिडिओ क्लिपसह कौटुंबिक कलहाच्या क्लिपचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खासदार दत्तक गावांचा किती विकास झाला, हा प्रश्नही या निमित्ताने लोकचर्चेत आला आहे. शेतकर्‍यांच्या समस्यांत केंद्र सरकारने काय दिलासा दिला, हेही शेतकरी विचारत आहे. शेतकर्‍यांचे प्रश्न संपत नाही, शेतकर्‍यांवरील आपत्तीचा पूर ओसरत नाही, केंद्र सरकार आश्वासने देण्यापेक्षा काही करीत नाही, याबाबत शेतकर्‍यातील नाराजीचा फटका भाजपला सहन करावाच लागेल, असे लोकचर्चेतून दिसते. पण भाजपच्या लेखी हे दिसत नाही. महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे हे सध्या राष्ट्रवादीत असले तरी त्यांना काँग्रेसच्या कार्यनियोजन निवडणूक जाहिरनाम्याचा दिलासा वाटतो. त्यांच्या प्रचाराची धुरा त्यांचे मामा माजी पालकमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे आहे. त्यामुळेच त्यांनी कोणत्या विरोधकाला कॉल करीत मदत मागितली, ही माहिती सार्वजनिक होत आहे. काँग्रेसचे माजी आमदार झाले राष्ट्रवादीचे उमेदवार; अमर काळे वर्ध्यातून 'तुतारी'वर लढणार - Marathi News | Former Congress MLA became NCP candidate Amar Kale will fight on from ...अनिल देशमुख हे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांचा जिल्ह्यातला सार्वजनिक संपर्क मर्यादितच होता. अमर काळे यांच्यावर कोठलाही ठपका ठेवायला त्यांच्या विरोधकांनाही जागा नाही. ते पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्याशिवाय शरद पवार यांच्या सारखा दिग्गज नेता जिल्ह्यातील जनसामान्यांच्या संपर्कात राहून आढावा घेत आहे.

सध्या वर्धा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेता,आवाज कोणाचा?, असे विचारले तर तो जनतेच्या समस्यांचा नाही तर झेंडे, खांद्यावरील दुपट्टे, छातीवरील बिल्ल्यांचाच दिसतो. वर्धा जिल्ह्यातील जिल्हास्तरीय नेतृत्त्वाचा विचार करता, मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या स्तरावरील नेतृत्त्व उभे करण्यास सर्वच राजकीय पक्षांचे अपयश ठळकपणे दिसते. सहकार महर्षी बापूरावजी देशमुख, बंसिलालजी पाटणी, प्रभाताई राव यांच्यानंतर जिल्हास्तरावरील नेतृत्त्व उभे करण्यात कोणत्याही राजकीय पक्षाला यश आले नाही, ही सर्वपक्षीय शोकांतिकाच आहे. भाजपला तरी जिल्हास्तरीय नेतृत्त्व कोठे आहे?. दत्ता मेघे यांच्या निमित्ताने सौजन्यशील धीरोदात्त नेतृत्त्व उभे राहात असतानाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते सध्या राजकारणात सक्रीय नाहीत. ही जिल्ह्याची नुकसान पावती आहे. त्यामुळे तालुकापुरुषांची संख्या वाढली.

गांधीजी याच जिल्ह्यात युगपुरुष होते. आता गाव पुरुषांचीही वाणवा दिसते. नेतेच जिंदाबाद झाल्याने विकास हिरमुसतो, त्या पर्वात ही लोकसभा निवडणूक होत असताना मी यापूर्वीच्या विश्लेषणात म्हटल्याप्रमाणे जनतेनेच त्यांचे प्रश्न हाती घेत निवडणुकीला जाण्याचे ठरविले, हाच गांधीजींचा संदेश होता. तो गांधीजींच्या जिल्ह्यात आचरणात येतो आहे. गांधीजींच्या वैचारिक पेरणीचा हा प्रभावच आहे. याचवेळी मात्र लढतीतील दोन्ही उमेदवार मतदारांना गृहित धरून पावले टाकायला लागल्याने मतदारांना ते भावलेले दिसत नाही. यातूनच सभेला होणारी गर्दी आणि त्यातून दिसणारा उत्स्फूर्त तसेच अस्वस्थ पाठिंबा उमेदवारांना हेरता येणे गरजेचे आहे. सध्या त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मतदारांना गृहीत धरण्याचीच गृहितके जोरात आहे.याचा राजकीय ज्योतिषांना वाव मिळेल,पण याचा फटका कोणाला बसणार,ते मतदान यंत्रातील मतमोजणीनंतर दिसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!