Breaking newsBuldanaBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या मदतीला राजू शेट्टी धावले; तुपकरांसाठी प्रचाराला लागण्याचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निर्देश!

– बुलढाणासह हातकणंगले, सांगली व परभणीतील उमेदवारांसाठी शेट्टींचे शेतकरी जनतेला मतदानाचे आवाहन

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रविकांत तुपकर हे आपले सहकारी असून, त्यांच्या प्रचारासाठी ‘स्वाभिमानी’चे राज्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी चळवळीतील सहकाऱ्यांनी कामाला लागावे, असे आदेश राजू शेट्टी यांनी दिले आहेत. त्यांच्यावतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्रदेखील दिले आहे.

शेतकरी नेते रविकांत तुपकर हे गेल्या २२ वर्षांपासून कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक, तरुण, महिला व समाजातील सर्व घटकांसाठी अविरतपणे लढा देत आले आहे. स्व. शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी शालेय जीवनापासूनच चळवळीत उडी घेतली होती. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात त्यांनी राज्यभर मोठे संघटन उभे केले असून अनेक आंदोलनात राजू शेट्टी यांच्या खांद्याला खांदा लाऊन सहभाग घेत आंदोलने यशस्वी केले आहेत. बुलढाणा लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकर हे स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यांच्या उमेदवारीला राजू शेट्टी यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबत ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी लेखी पत्र दिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने हातकणगंले, बुलढाणा, सांगली व परभणी या लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार लोकसभेची निवडणूक लढवित आहेत, तरी राज्यभरातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या चार मतदारसंघातील आपल्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करण्यासाठी त्यांच्या मतदारसंघात जाऊन प्रचार प्रक्रियेत सहभागी व्हावे, अशी सूचनावजा विनंती या पत्रातून प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे. आपण कोणाशीही आघाडी केलेली नसून आपले चारही उमेदवार स्वतंत्र आहेत, असेही या पत्रात नमुद आहे.
स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेने यापूर्वीच तुपकरांना पाठिंबा देऊन प्रचाराला सुरुवात केली आहे. तर राजू शेट्टी यांनीदेखील तुपकरांना पाठिंबा देत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताकदीने प्रचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या दोन्ही शेतकरी संघटनांची ताकद एकत्रीतपणे तुपकरांच्या पाठिशी उभी राहिली आहे. तर दुसरीकडे विविध पक्षातील पदाधिकारीदेखील पक्षाचा राजीनामा देऊन उघडपणे रविकांत तुपकर यांच्या प्रचाराला भिडले आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात सर्वसामान्य नागरिक तुपकरांना पाठबळ देत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे आता अपक्ष असुनही रविकांत तुपकर यांची ताकद वाढली आहे. जनसामान्यांचा उमेदवार म्हणून तुपकरांची हवा संपूर्ण मतदारसंघात झाली आहे. सर्वसामान्यांच्या बळावरच जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची ही लढाई विजयाच्या दिशेने आगेकूच करत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


रविकांत तुपकरांच्या हजारो बहिणी भावासाठी मागताहेत मतांचा जोगवा!

लोकसभेच्या रणधुमाळीत प्रचाराचा वेग वाढला आहे. शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या हक्काचा उमेदवार म्हणून सध्या रविकांत तुपकर यांच्या प्रचारासाठी समाजातील सर्वच घटक एकवटले आहेत. रविकांत तुपकर यांच्या प्रचारासाठी आता नारीशक्तीदेखील मोठ्या ताकदीने मैदानात उतरली आहे. असंख्य महिला शहरी आणि ग्रामीण भागात घरोघरी पोहोचून मतांचा जोगवा मागत आहेत. मी रविकांत तुपकरांची बहीण आहे, माझ्या भावासाठी एक मत द्या आणि इतरांनाही सांगा, असा प्रचार महिला करत आहेत. सर्वसामान्यांच्या हक्काचा माणूस म्हणून गावगाड्यातील सर्वसामान्य नागरिकांसह शहरातील नागरिक आणि सर्वच समाजातील लहान मोठे घटक आता रविकांत तुपकर यांच्या प्रचारासाठी उघडपणे समोर येत आहेत. यात आता महिलाही मागे नाहीत. विविध गावातील महिला रविकांत तुपकरांच्या प्रचारासाठी आता स्वतःहून घराबाहेर पडत आहेत. ही नारीशक्ती रविकांत तुपकर यांच्याकरिता मतांचा जोगवा मागण्यासाठी घरोघरी जात आहे. प्रत्येक घरात पोहचून जात-पात, धर्म, पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवून सर्वसामान्यांसाठी लढणारा आपल्या हक्काचा माणूस रविकांत तुपकर यांना मतदान करा असा जोगवा नारीशक्ती मागत आहे. मी रविकांत तुपकरांची बहीण आहे, माझ्या भावासाठी एक मत द्या आणि इतरांनाही सांगा, अशी भावनिक साध महिला घालत आहेत. जेवढ्या पोटतिडकीने ह्या महिला रविकांत तुपकरांसाठी फिरत आहेत, तेवढाच चांगला प्रतिसाद त्यांना मिळत असल्याने या महिलांचा उत्साह आणखी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!