सिंदखेडराजा (अनिल दराडे) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक सामान्य निरीक्षक पी. जे. भागदेव हे सध्या बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या दौऱ्यावर असून त्यांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाला भेट देऊन त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्यासमवेत बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या. व मतदान केंद्रांचा आढावा घेतला.
निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व स्तरावरील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, मतदान यंत्रे सुरक्षा कक्षामध्ये सुरक्षित आहेत तसेच CCTV च्या सुरक्षितेविषयी खातरजमा श्री. भागदेव यांच्याकडून करण्यात आली. श्री. भागदेव यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील शिवाजी हायस्कूल देऊळगाव राजा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देऊळगाव मही, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टाकरखेड भागिले या मतदान केंद्रांना आज भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करून घेतली. निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची संख्या सद्यस्थितीमध्ये पुरेशी आहे, आंतर जिल्ह्याच्या ठिकाणी चेक पोस्ट सक्रिय आहे इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला. आजच्या आढावा दौऱ्यामध्ये मा. तहसीलदार देऊळगाव राजा वैशाली डोंगरजाळ , मा. नायब तहसीलदार देऊळगाव राजा अस्मा मुजावर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महल्ले,नोडल अधिकारी श्री. मतकर, अव्वल कारकून देऊळगाव राजा श्री. प्रशांत वाघ इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.