बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगाव तालुक्यातील गणेशपूर व परिसरात काल (दि.9) अवकाळी पाऊस व गारपिटीने थैमान घातले. यामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. यावेळी तासाभराच्याआत सर्वात आधी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरीताई तुपकरांनी गणेशपूर गाठून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला.
काल झालेल्या अवकाळी पावसामुळे गणेशपूर येथे मोठ्या प्रमाणात शेतीपिकाचे नुकसान झाले. ज्वारी, बियाचा कांदा व गव्हाचे मोठे नुकसान झाले. पशुधनाचीदेखील हानी झाली. यावेळी नुकसानीची माहिती मिळताच तातडीने ॲड.शर्वरीताई तुपकर यांनी गणेशपूर गाठले. नुकसानीची पाहणी करून त्यांनी ग्रामस्थांना धीर दिला. सध्या निवडणुकीची धामधूम सुरू असली तरी शेतकऱ्यांच्या नुकसान इकडे दुर्लक्ष न करता प्रशासनाने खात्रीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवावी, त्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.