ChikhaliVidharbha

मेरा बुद्रूक ते मेरा खुर्द रस्त्याच्या साईडपट्ट्यांचे काम धोकादायक; दुचाकीस्वारांच्या जीवावर उठले!

चिखली (कैलास आंधळे) – तालुक्यातील मेरा बुद्रूक ते मेरा खुर्द या रस्त्याच्या साईडपट्ट्याचे काम निकृष्टदर्जाचे तर होतच आहे, पण हे काम धोकादायक पद्धतीने होत असल्याने ते दुचाकीस्वारांच्या जीवावर उठलेले आहे. बांधकाम खाते व ठेकेदार हे एखाद्याचा जीव जाण्याची वाट पाहात आहेत का, असा संतप्त सवाल परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.
हाच तो ठेकेदार.

चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक ते मेरा खुर्द या रस्त्यावर चालू असलेल्या साईडपट्ट्यांचे काम अनेक वाहनधारकांसाठी कर्दनकाळ ठरत असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. मेरा खुर्द ते साखरखेर्डा ह्या रस्त्यावर नेहमीच वाहनाची रहदारी असते, तरीसुद्धा संबंधित विभाग व ठेकेदाराने संगनमत करून कोणतीही उपाययोजना न करता, या रस्त्यावर दोन्ही बाजूने एकाचवेळी साईडपट्ट्यांचे काम चालू केल्यामुळे अनेक वाहनधारकांची दुचाकी ही अस्ताव्यस्त पडलेल्या गिट्टीमुळे घसरून अनेक अपघात होताना दिसत आहे. तसेच, एखादा भीषण अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित उपअभियंत्याने वेळीच उपाययोजना करून वाहनधारकांना होणारा त्रास थांबवावा, असे आवाहन वाहनधारक व ग्रामस्थ करत आहेत.


या रोडवरून जाताना अनेक दुचाकीस्वार आपल्या वाहनाचे संतुलन बिघडून त्यामध्ये ते अपघातग्रस्त झाले आहे. असे असतानासुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी ह्या रस्त्याच्या कामावर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. सद्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण पेटलेले असून, आमदार व लोकप्रतिनिधी हे प्रचारात बिझी आहेत. त्यामुळे लोकांच्या जीवावर उठलेल्या या कामाकडे लक्ष द्यायला व संबंधित बेजबाबदार ठेकेदाराला वठणीवर आणायला या लोकप्रतिनिधींना वेळ नाही, अशी संतप्त भावना ग्रामस्थ व दुचाकीस्वार व्यक्त करताना दिसत आहेत.
———–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!