मेहकर (तालुका प्रतिनिधी) – साखरखेर्डा पोलिस स्टेशन हद्दीतील लव्हाळा फाटाजवळील पावर हाऊससमोर मालवाहू ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी झालेले आहेत. हा अपघात रात्री तीनच्या सुमारास झाला. भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याची माहिती मिळाली. स्टेट बँकेचे लॉकर घेऊन एमएच १८ बीजी ८२२५ या क्रमांकाचा आयशर ट्रक धुळे येथून हैदराबादला जात होता. याचवेळी औंढानागनाथ येथून दर्शन घेऊन बुलढाणा येथे होन्डा एमेझ (एमएच २८-बीके १७९५ ) ही कार जात होती.
या धडकेत कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी जवळच्या पोलिस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी अपघातग्रस्त ठिकाणी जाऊन जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधील अत्यवस्थ वैभव रामकृष्ण लोखंडे यांचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे (सर्व रा सुंदरखेड तालुका बुलडाणा) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना संभाजीनगर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. अविनाश पंजाब गव्हाने (रा सुंदरखेड )हा किरकोळ जखमी झाला आहे. हवालदार कडूबा डोईफोडे, जमादार लक्ष्मण ईनामे, राजेश गीते, मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. पोलीसांनी आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. ट्रक चालक भरधाव वेगात वाहन चालवत असल्याची माहिती मिळत आहे. अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. थोड्याच वेळाच पोलिसांनी वाहतुक सेवा सुरळीत केली. अपघातामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.