BuldanaBULDHANA

जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांचे रूपड़े आता पालटणार!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यातील मागासवर्गीय वस्त्यांचेही आता रूपड़े पालटणार असून, अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी विकास योजना २०२३ -२०२४ अंतर्गत जिल्हा परिषदेकड़ून जिल्ह्यातील ६६१ वस्त्यांंतील विकासकामासाठी तब्बल ३५ कोटी रूपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाड़े रूजू झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या कामांनी गती धरल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याच संमतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी या कामांना नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठीचा प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी सादर केला होता. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीच्या विकास करणे या योजनेतून राज्य शासन जिल्हा परिषदांना निधी पुरवीत असते. सदर निधीचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तालुकानिहाय अनुसूचीत जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक शर्ती व अटींची पूर्तता करणार्‍या गावांतील अनूसूचित जातीच्या वस्त्यांना सदर निधी मंजूर केला जातो. जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील ६६१ अनूसूचित जातीच्या वस्त्यांमध्ये रस्ते, नाल्यासह विविध आवश्यक कामासाठी जवळजवळ ३५ कोटी एवढ्या रूपयांच्या विकासकामांना नुकतीच प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये बुलढाणा पंचायत समितीअंतर्गत काँक्रिट रस्ता कामासाठी अंभोड़ा, झरी, प्रत्येकी ५ लक्ष, सावळी रस्ता, नाली ७ लक्ष व समाजमंदीर दुरूस्ती १ लक्ष, उमाळा काँक्रिट रस्ता १० लक्ष,ड़ोंगरखंड़ाळा कॉक्रीट रस्ता १० लक्ष व भूमिगत गटार ७ लक्ष, भादोला कॉक्रीट रस्ता ८ लक्ष, हतेड़ीबु. कॉक्रीट रस्ता ६ लक्ष, कुंबेफळ नाली ५ लक्ष, मौंढाळा कॉक्रीट रस्ता १४ लक्ष, पाड़ळी कॉ. रस्ता ५ लक्ष व नाली ५ लक्ष, सातगाव म्हसला नाली ४ लक्ष, पिंपळगाव सराई रस्ता ७ लक्ष तांदुळवाड़ी कॉ. रस्ता १४ लक्ष, सोयगाव कॉक्रीट रस्ता १६ लक्ष ,वरूड़ कॉक्रीट रस्ता ५ लक्ष ८४ हजार, अजिसपूर रस्ता ४ लक्ष, सव रस्ता ५ लक्ष, म्हटला बु.पेव्हर ब्लॉक ६ लक्ष व भूमिगत गटार ६ लक्ष, येळगाव रस्ता ७ लक्ष, जांब रस्ता १२ लक्ष, जामठी रस्ता ८ लक्ष, शेकापूर रस्ता ३ लक्ष लक्ष, धाड़ रस्ता ९ लक्ष, धामणगाव रस्ता ७ लक्ष, उंबरखेड़ रस्ता ३ लक्ष, खुपगाव रस्ता १० लक्ष ६७ हजार, माळविहीर कॉक्रीट रस्ता ७ लक्ष, दुधा रस्ता ६ लक्ष, गिरड़ा रस्ता ८ लक्ष, पिं.सराई रस्ता ७ लक्ष, ईजलापूर रस्ता ७ लक्ष, कोलवड़ रस्ता २४ लक्ष, सागवन रस्ता ११ लक्ष, माळवंड़ी भूमिगत गटार ५ लक्ष, हतेड़ी खु. व कुलमखेड़ रस्ता प्रत्येकी ५ लक्ष, ढालसावंगी रस्ता १० लक्ष, म्हसला बु.रस्ता ८ लक्ष, रूईखेड़ मायंबा रस्ता १३ लक्ष, येळगाव रस्ता ७ लक्ष, दत्तपूर रस्ता ६ लक्ष बिरसिंगपूर रस्ता व नाली ६ लक्ष, मेहकर पंचायत समितीअंतर्गत फैजलापूर रस्ता व नाली ८ लक्ष, नेमतापूर रस्ता व नाली ८ लक्ष, मोळा रस्ता व नाली १८ लक्ष,मोळी रस्ता ६ लक्ष, गणपूर रस्ता व व नाली ८ लक्ष, सावंगीवीर रस्ता व नाली १२ लक्ष, मोहोदरी रस्ता व नाली ७ लक्ष ३३ हजार, सावत्रा पेव्हर ब्लॉक व कॉक्रीट रस्ता १२ लक्ष, पिंपळगाव ऊंड़ा रस्ता १४ लक्ष, सोनारगव्हाण रस्ता ६ लक्ष, पाचला रस्ता ४ लक्ष, नागापूर रस्ता ६ लक्ष ५० हजार, गोहोगाव पेव्हरब्लॉक ९ लक्ष, वरूड़ रस्ता १० लक्ष, बाभुळखेड़ पेव्हर ब्लॉक व रस्ता १६ लक्ष, उसरण रस्ता ८ लक्ष, नागझरी बु. रस्ता ८ लक्ष, नागझरी खु.रस्ता ८ लक्ष, गजरखेड़ रस्ता १४ लक्ष, बरटाळा रस्ता १० लक्ष, शिवपुरी रस्ता ५ लक्ष, दादुलगव्हाण नाली ६ लक्ष, सावंगीमाळी रस्ता व नाली ८ लक्ष, बोरी पेव्हरब्लॉक ८ लक्ष, सोनाटी रस्ता ५ लक्ष, कळपविहीर रस्ता ५ लक्ष, सुळा रस्ता ५ लक्ष, देऊळ्गावमाळी रस्ता १० लक्ष, जानेफळ रस्ता ५ लक्ष, हिवरखेड़ रस्ता १२ लक्ष, सा.वाड़ी रस्ता ५ लक्ष, जैताळा रस्ता ६ लक्ष, थार रस्ता ७ लक्ष, वड़ाळी रस्ता ५ लक्ष, सारशिव रस्ता १० लक्ष, चायगाव रस्ता ८ लक्ष, मिस्कीनवाड़ी रस्ता ७ लक्ष, मोसंबेवाड़ी रस्ता ३ लक्ष, उटी रस्ता १४ लक्ष, पांगरखेड़ रस्ता ५ लक्ष, अंजनी बु. रस्ता ५ लक्ष, खंड़ाळा पेव्हरब्लॉक व कॉक्रीट रस्ता १० लक्ष, खानापूर पेव्हर ४ लक्ष, साब्रा पेव्हर व रस्ता १० लक्ष, वरवंड़ रस्ता १५ लक्ष, देऊळगाव साकरशा नाली व रस्ता ७ लक्ष ५० हजार, थार रस्ता ६ लक्ष, बेलगाव रस्ता ५ लक्ष, कळंबेश्वर रस्ता व पेव्हर ८ लक्ष ५० हजार, शेलगाव काकड़े रस्ता ४ लक्ष, विश्वी रस्ता ४ लक्ष१९ हजार व पिंप्री माळी पेव्हर ५ लक्ष आदि कामांचा समावेश आहे. याशिवाय, चिखली पंचायत समितीअंतर्गत ८१ कामासाठी ४ कोटी २४ लक्ष, देऊळगावराजा पंचायत समिती अंतर्गत ३६ कामासाठी १ कोटी ७१ लाख, सिंदखेड़राजा पंस अंतर्गत ५८ कामासाठी ३ कोटी २१ लक्ष, लोणार पंस अंतर्गत ४४ कामासाठी २ कोटी १९ लाख, खामगाव पंस अंतर्गत ७८ कामासाठी ४ कोटी २६ लक्ष, नांदुरा पंस अंतर्गत ४७ कामासाठी २ कोटी ३३ लक्ष, शेगाव पंस अंतर्गत ३६ कामासाठी १ कोटी ८७ लक्ष, मलकापूर पंस अंतर्गत २९ कामासाठी ६१ लक्ष, जळगाव जामोद पंस अंतर्गत २९ कामासाठी १ कोटी ७२ लक्ष, संग्रामपूर पंस अंतर्गत ४८ कामासाठी १ कोटी ८६ लक्ष व मोताळा पंस. अंतर्गत ३७ कामांसाठी २ कोटी २६ लक्ष रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विशाल नरवाड़े रूजू झाल्यापासून जि.प.च्या विविध विभागातील कामांना गती आल्याचे दिसत आहे. त्यांच्याच संमतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी जिल्ह्यातील ३५ कोटीच्या ६६१ कामांना नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली आहे. जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांनी यासाठीचा प्रस्ताव सादर केला होता. वरिष्ठ लिपीक राजू मोठेसह संबंधित कर्मचार्‍यांनी प्रस्ताव तयार करण्यासाठी मेहनत घेतली. यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला.सदर कामे मार्च २५ पर्यंत पूर्ण करावयाची आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!