बिबी (ऋषी दंदाले) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस दलातील अनेक अधिकार्यांच्या बदल्या बाहेर जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. यामध्ये बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांची बदली यवतमाळ येथे झाली असून, त्यांचे जागी यवतमाळ जिल्ह्यातून आलेले संदीप पाटील यांनी बिबी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला. नवे ठाणेदार पाटील यांचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने स्वागत करण्यात आले आहे.
बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे यांनी बिबी येथे एक वर्षापासून बिबी परिसरात सेवा देत असताना, पोलीस खात्यामध्ये कार्य करत असताना अतिशय चांगली कामगिरी केली होती. वेळप्रसंगी पोलिसी खाक्या दाखवावा लागतो, परंतु परिसरातील सुज्ञ लोकांमुळे तो दाखवण्याची वेळ आली नाही. कायदा सुव्यवस्था चांगल्या प्रकारे सांभाळल्या गेली. त्यामुळे बिबी परिसरातील जनतेला चांगली सेवा दिल्या गेल्याचे समाधान वाटते असे निरोप समारंभाच्या वेळी ठाणेदार सोनकांबळे बोलायचे विसरले नाहीत. यावेळी सोनकांबळे यांना निरोप आणि संदीप पाटील यांनी सत्कार प्रसंगी यापुढेही ग्रामस्थांचे असेच सहकार्य पोलिसांना असणे गरजेचे आहे असे ठाणेदार पाटील यांनी सांगितले. यावेळी दीपक गुलमोहर सरपंचपुत्र, शंभूराजे ग्रूप, श्रीराम प्रतिष्ठान, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन दोन्ही अधिकार्यांचे एकाच वेळी स्वागत केले.